Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: सवाई माधोपूर येथे होणार विकी कौशल व कतरिना कैफचे लग्न; रणथंबोरमध्ये 45 हॉटेल्स बुक- Reports

14 व्या शतकात बांधलेल्या एका सुंदर किल्ल्याचे या रिसॉर्टमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. मुळात तो राजस्थानी राजघराण्यातील आहे

Vicky Kaushal & Katrina Kaif (Photo Credits: Instagram)

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत, असे वृत्त आहे की, दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या वृत्ताबाबत कतरिना आणि विकीचे कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नसले तरी या दोघांच्या लग्नाबाबत दररोज काही ना काही बातम्या समोर येत आहेत. त्याचवेळी आता, दोघांच्या लग्नासाठी रणथंबोरमध्ये हॉटेल्सही बुक झाल्याची बातमी आहे. वृत्तानुसार, 7 ते 9 डिसेंबर दरम्यान कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्न करणार आहेत.

राजस्थानातील सवाई माधोपूर येथील आलिशान रिसॉर्टमध्ये या वर्षी डिसेंबरमध्ये ते लग्नबंधनामध्ये अडकतील. या लग्नामध्ये अनेक बडे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत, या पार्श्‍वभूमीवर रणथंबोरमध्ये 45 हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत, मात्र वृत्ताला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्याचबरोबर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, या लग्नात अभिनेत्री अनुष्का शर्मा, भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि दोघांची मुलगी वामिका खास पाहुणे म्हणून दिसणार आहेत.

अलीकडे, कतरिना कैफच्या मेहंदीबद्दल अशीही बातमी आली होती की राजस्थानच्या जोधपूरच्या पाली जिल्ह्यातील सोजत मेहंदी कतरिना कैफला तिच्या मेहंदीच्या खास दिवशी पाठवली जाईल. सोजत मेंदीला संपूर्ण जगात विशेष स्थान आहे आणि आता ही मेहंदी कतरिनाला भेट म्हणून पाठवली जाणार आहे. सोजतचे कारागीर मेहंदी तयार करत असून त्यात कोणतेही रसायन मिसळले जाणार नाही. (हेही वाचा: Shalmali Kholgade-Farhan Shaikh सोबत अडकली विवाहबंधनात; अत्यंत साधा विवाह सोहळा ते लग्नातील DIY वरमाला, पहा गायिकेच्या लग्नातील काही क्षण)

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे दोघांचे लग्न होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 14 व्या शतकात बांधलेल्या एका सुंदर किल्ल्याचे या रिसॉर्टमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. मुळात तो राजस्थानी राजघराण्यातील आहे, ज्याच्या समोर चौथचे बारवडा मंदिर आहे. सिक्स सेन्स फोर्टमध्ये 48 अतिथी सूट आहेत. हा किल्ला जवळजवळ 800 वर्षे जुना आहे.