Bhediya सिनेमाच्या सेट वरुन Varun Dhawan चा Running Video आला समोर; पहा अभिनेत्याचा डॅशिंग अंदाज

आपल्या भूमिकेसाठी वरुण कठोर मेहनत घेत असून अगदी झोकून देऊन काम करतो.

Varun Dhawan (Photo Credits: Instagram)

वरुण धवन (Varun Dhawan) याला बॉलिवूडचा एक मेहनती, जिद्दी अभिनेता आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आपल्या भूमिकेसाठी वरुण कठोर मेहनत घेत असून अगदी झोकून देऊन काम करतो. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ समोर येत आहे. वरुण धवनने भेड़िया (Bhediya) सिनेमाच्या सेटवरुन एक वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. यात वरुण धावताना दिसत आहे. यातील वरुणचा डॅशिंग अंदाज पाहण्यासारखा आहे. यात वरुण अगदी एखाद्या प्रो एथलीट सारखा दिसतो. (Bhediya Teaser: वरुण धवन आणि क्रिती सेनॉन स्टारर 'भेड़िया' चित्रपटाचा टीजर पाहून अंगाचा उडेल थरकाप, Watch Video)

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, वरुण धवन ब्लॅक शॉटमध्ये वेगाने धावत आहे. यात तो आपल्या ट्रेनरलाही मागे टाकताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना वरुणने लिहिले की, "बॅक टू रनिंग." वरुणच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

'भेड़िया' सिनेमात वरुण धवन सोबत कीर्ति सेनन आणि अभिषेक बनर्जी देखील झळकणार आहेत. यापूर्वी वरुण धवनचा 'कूली नंबर 1' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात वरुण आणि सारा अली खान ही जोडी पाहायला मिळाली होती. भेड़िया सोबतच वरुण धवन सध्या 'जुग जुग जियो' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.