Varun Dhawan-Natasha Dalal या घरातून करणार नव्या आयुष्याची सुरुवात; पहा New House Video

अलिबाग येथे अगदी धुमधडाक्यात हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर वरुण आणि नताशा आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात नवीन घरातून करणार आहेत.

Varun Dhawan-Natasha Dalal (Photo Credits: Instagram)

Varun Dhawan-Natasha Dalal's New House:  बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) अलिकडेच आपली गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal) हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. अलिबाग येथे अगदी धुमधडाक्यात हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर वरुण आणि नताशा आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात नवीन घरातून (New House) करणार आहेत. मुंबईतील वरुण आणि नताशा यांच्या आलिशान घराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, वरुण आई-वडीलांसोबत राहत नसल्याचा खुलासा त्याने करीना कपूर चा लोकप्रिय रेडिओ शो 'What Women Want' मध्ये केला होता.

वरुणने हे नवे घर 2017 मध्ये खरेदी केले होते. आता या नव्या घराची सफर घडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. यात वरुण स्वत: आपल्या नव्या घराची सफर घडवतआहे. व्हिडिओत बेडरुम, बाथरुम, जिम एरिया, लिव्हिंग रुम आणि गेस्ट रुम ची झलक पाहायला मिळते. (Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: नताशा दलाल कोण आहे? जिच्याशी वरुण धवन घेणार आहे सात फेरे)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

वरुण आणि नताशा यांची मैत्री शाळेपासून आहे. मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत येऊन पोहचला आहे. नताशासोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्यास तयार असल्याचे वरुणने यापूर्वी सांगितले होते. दरम्यान, दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत आणि सुंदररीत्या सजवलेल्या  या घरातून ते आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. (Varun Dhawan चे लग्नानंतर पहिले ट्विट; मानले चाहत्यांचे आभार)

दरम्यान, यापूर्वी वरुण धवनने चाहत्यांचे आभार मानण्यासाठी खास ट्विट केले होते. लग्नानिमित्त चाहत्यांकडून मिळालेले प्रेम आणि सकारात्मकता मिळाल्याबद्दल त्याने सर्व चाहत्यांना धन्यवाद दिले.