Utkarsh Sharma Birthday: 'ग़दर' मधील हा बालकलाकार बनला आहे एक Hot आणि Handsome अभिनेता (Photos)

तारासिंग आणि सकीना यांचा मुलगा. क्युट चेहरा, पाणीदार डोळे, कोमल आवाज, डोक्याला पगडी बांधलेला हा जीते आजही आठवत असेल.

Utkarsh Sharma

चित्रपटसृष्टीमध्ये बाल कलाकारांचे विशेष महत्व राहिले आहे. इतक्या लहान वयात या छोट्या मुलांचा अभिनय पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अनेक चित्रपट तर अशा बाल कलाकारांमुळे हिट ठरले आहे. कुछ कुछ होता हैं, मकड़ी इ. लहानपणापासून अशाप्रकारचे एक्सपोजर मिळाल्याने अनेक बाल कलाकार आज एक लोकप्रिय अभिनेते अथवा अभिनेत्री बनल्या आहेत. असाच एक बाल कलाकार म्हणजे, 2001 साली प्रदर्शित झालेल्या ग़दर: एक प्रेम कथा (Gadar: Ek Prem Katha) चित्रपटातील जीते. तारासिंग आणि सकीना यांचा मुलगा. क्युट चेहरा, पाणीदार डोळे, कोमल आवाज, डोक्याला पगडी बांधलेला हा जीते आजही आठवत असेल.

उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) या अभिनेत्याने ही भूमिका साकारली होती. अवघ्या चार ते पाच वर्षांच्या मुलाची ही भूमिका चांगलीच भाव खावून गेली होती. त्यावेळी उत्कर्षचे वय अवघे सहा वर्षे होते, आणि आज उत्कर्ष आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे.

उत्कर्ष शर्मा हा बॉलीवूडचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा. अनिल यांनीच ग़दर: एक प्रेम कथा दिग्दर्शित केला होता. त्यानंतर उत्कर्षने 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो' अणि 'अपने' या चित्रपटांमध्येही बाल कलाकार म्हणून भूमिका केली.

उत्कर्षने चॅपमन विद्यापीठ, यूएसए येथून बॅचलर्स ऑफ फाइन आर्ट्स इन प्रोडक्शन अँड डिरेक्शन ही पदवी प्राप्त केली त्यानंतर ली स्ट्रॅसबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूट येथून मेथड नॉन एक्टिंगचा अभ्यास केला आहे. ग़दरमधील भूमिकेमुळे, उत्कर्षने  जीनियस या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये हिरो म्हणून पदार्पण करत केले. 24 ऑगस्ट 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

उत्कर्ष शर्माला इंजिनीअर बनायचे होते, मात्र वीर चित्रपटावेळी काही कारणास्तव त्याला अनिल शर्मा यांना दिग्दर्शनात मदत करावी करावी. त्यानंतर त्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

उत्कर्ष हा भगवत गीतेचे नेहमी पारायण करतो. त्याचे विचार आणि आदर्श यावरच बनले आहेत.  उत्कर्षला वाचन , फुटबॉल आणि नृत्याचीही आवड आहे. (हेही वाचा: Photos : 'कुछ कुछ होता है'ची छोटी अंजली आता बनली आहे एक बोल्ड अभिनेत्री)

दरम्यान, अनिल शर्मा अशा सर्वोत्कृष्ट तीन दिग्दर्शकांपैकी आहेत, ज्यांनी बजेटपेक्षा कैक पतीने अधिक कमाईचे चित्रपट दिले आहे. ग़दर हा 2000 दशकातला सर्वात जास्त कमाई चित्रपट ठरला होता. आता अनिल शर्मा त्याच्या दुसऱ्या भागाची तयारी करत आहेत, ज्यामध्ये उत्कर्ष शर्मा एक महत्वाची भूमिका बजावणार आहे.