Urfi Javed Controversy: नवीन गाण्यातील Bold Cloths मुळे उर्फी जावेद अडचणीत; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Watch Song)

उर्फीने अतिशय साधा भारतीय पोशाख परिधान केला होता.

Urfi Javed (Photo Credits-Instagram)

आपल्या हटके कपड्यांमुळे उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत असते. तिची विचित्र फॅशन स्टाईल तिला नेहमीच प्रसिद्धी देते. टीव्ही स्टारपासून फॅशन क्वीन बनलेल्या उर्फीच्या जवळजवळ प्रत्येक आऊटफिटची चर्चा होते. आता उर्फी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फी तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'हाये हाये ये मजबूरी' या म्युझिक व्हिडिओमुळे अडचणीत आली आहे. तिच्याविरोधात दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही तक्रार कोणी केली आहे, त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही, मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून उर्फीवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. उर्फी ही 'हाये हाये ये मजबूरी' या ताज्या गाण्याच्या माध्यमातून अश्लील प्रकाशित व प्रसारित करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. उर्फीने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

हे गाणे 11 ऑक्टोबर रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झाले. या गाण्यात उर्फीने लाल साडी नेसून डान्स केला आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून ते ट्रेंडमध्ये आहे. एका दिवसात या गाण्याला जवळपास 8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्यात उर्फी पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान उर्फीचा अपघातही झाला होता, शूटिंगदरम्यान ती झोपाळ्यावरून पडली होती. (हेही वाचा: Sherlyn Chopra ने पोलिसात दाखल केली तक्रार; Sajid Khan वर केला लैंगिक अत्याचाराचा आरोप)

दरम्यान, प्रत्येक वेळी आपल्या लूकने लोकांना आश्चर्यचकित करणारी उर्फी जावेद दिवाळीत अगदी साध्या लूकमध्ये दिसली. उर्फीने अतिशय साधा भारतीय पोशाख परिधान केला होता. उर्फीबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे, पण गेल्या वर्षी बिग बॉस ओटीटीमध्ये तिला प्रसिद्धी मिळाली. उर्फी पहिल्या आठवड्यातच शोमधून बाहेर पडली होती, परंतु बाहेर आल्यानंतर उर्फीने तिच्या फॅशनद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली.