Welcome 3: चाहत्यांना हसवण्यासाठी उदय आणि मजनू भाई पुन्हा येणार, वेलकम 3 चे शूटिंग 2022 मध्ये होणार सुरु

2022 च्या सुरुवातीला चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते. विशेष म्हणजे वेलकम 3 मध्ये पुन्हा एकदा मोठी स्टारकास्ट दिसणार आहे, जी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल. या चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अॅक्शन आणि कॉमेडीचा आनंद लुटता येणार आहे.

Welcome 3: चाहत्यांना हसवण्यासाठी उदय आणि मजनू भाई पुन्हा येणार, वेलकम 3 चे शूटिंग 2022 मध्ये होणार सुरु
Welcome Nana Patekar & Anil Kapoor (Photo Credit - FB)

बॉलीवूडच्या हिट कॉमेडी वेलकमच्या तिसर्‍या (Welcome 3) भागाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि आता निर्मात्यांनी त्याचा तिसरा भाग (Welcome 3) जाहीर केला आहे. या चित्रपटाचे शूटिंग २०२२ पासून सुरू होणार आहे. वेलकम आणि वेलकम बॅकमध्ये जबरदस्त कॉमेडीची छटा जोडल्यानंतर वेलकम 3 मध्ये नाना पाटेकर, (Nana Patekar) अनिल कपूर (Anil Kapoor) आणि परेश रावल (Paresh Rawal) पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेलकम 3 ची स्क्रिप्ट लिहिली गेली आहे आणि स्टारकास्ट देखील फायनल झाली आहे. 2022 च्या सुरुवातीला चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते. विशेष म्हणजे वेलकम 3 मध्ये पुन्हा एकदा मोठी स्टारकास्ट दिसणार आहे, जी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल. या चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अॅक्शन आणि कॉमेडीचा आनंद लुटता येणार आहे.

वेलकम फ्रँचायझीचा हा चित्रपट फिरोज नाडियादवाला देखील बनवणार आहेत. वेलकमचा सिक्वेल असल्याने प्रेक्षक त्याच्या तिसऱ्या भागाच्या घोषणेची वाट पाहत होते. पण, आता बऱ्याच काळानंतर निर्माते त्याच्या तिसऱ्या भागासाठी सज्ज झाले आहेत. ज्यामध्ये नाना पाटेकर, परेश रावल आणि अनिल कपूर यांच्याशिवाय दोन मोठे स्टार्स दिसणार आहेत. ज्यांच्या नावांचा विचार सुरू आहे. (हे ही वाचा सनी लिओनीच्या 'Madhuban' या गाण्यावरून निर्माण झाला वाद, गाण्यावर बंदी घालण्याची साधूसंताची मागणी.)

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, कतरिना कैफ, अनिल कपूर, नाना पाटेकर आणि परेश रावल ही स्टारर 'वेलकम' डिसेंबर 2007 मध्ये आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना खूप हसवले. अनीस बज्मीचा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गाजला होता. यानंतर 2015 मध्ये त्याचा दुसरा भाग 'वेलकम बॅक' आला, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि कतरिनाऐवजी जॉन अब्राहम आणि श्रुती हासन मुख्य भूमिकेत होते आणि त्याला प्रेक्षकांचे खूप प्रेमही मिळाले.

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).