कोरोना संकटात मदत करण्यासाठी पुढे आली अक्षय कुमारची पत्नी Twinkle Khanna; 250 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचे दिले योगदान
एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांनी ही देणगी दिली आहे.
देशभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोनावरील परिणाम रोखण्यासाठी सरकार सातत्याने ठोस पावले उचलते आहे, परंतु आतापर्यंत याचा काही विशेष परिणाम झाल्याचे दिसत नाही. या व्यतिरिक्त ऑक्सिजनचा अभाव देखील लोकांसमोर एक समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचे अनेक स्टार मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी ट्विंकल खन्ना यांनी 250 यूनिट ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आणि 5000 नेझल कॅन्युलामध्ये योगदान देण्याचे ठरविले आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांनी ही देणगी दिली आहे. ट्विंकल खन्ना यांनी लिहिले आहे की, 'दैविक फाऊंडेशनच्या सर्व लोकांचे आभार, ज्यांनी मला यात मदत केली.' (वाचा - Rubina Dilaik Tests Postive for COVID-19: बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक ला कोरोना विषाणूची लागण; म्हणाली, एक महिन्यानंतर करेल प्लाझ्मा डोनेट)
त्यांनी स्वयंसेवी संस्थेचे पोस्ट रिपोस्ट करत लिहिलं आहे की, 'ज्यांनी यामध्ये मदत केली आणि जे सतत मदत करत आहेत, अशा सर्वांचे आभार. आता आम्ही 250 युनिट ऑक्सिजन कॉन्सेन्टर मशीन आणि 5 हजार हजार नेजल कॅन्युला भारतात पोहोचवण्यास तयार आहोत. या व्यतिरिक्त ट्विंकल यांनी सर्व भारतीयांना सुरक्षित राहण्यास सांगितले असून हिंमत ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.
दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता सोनू सूदही लोकांना मदत करत आहे. सोनू लोकांना ऑक्सिजन बेड पुरवत आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेन यांनी हॉस्पिटलमध्ये काही तास ऑक्सिजन शिल्लक असल्याने दिल्लीतील रुग्णालयात ऑक्सिजन दिला होता.