Nusrat Jahan Photos: तृणमूल काँग्रेसच्या खासदार, अभिनेत्री नुसरत जहा यांनी केलं ग्लॅमरस फोटोशूट; पहा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो

नुसरतच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये नुसरत अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

Nusrat Jahan Photo (Photo Credit - Instagram)

Nusrat Jahan Photos: पश्चिम बंगालमधील टीएमसी खासदार अभिनेत्री नुसरत जहा (Nusrat Jahan) सोशल मीडियावर खूपचं लोकप्रिय आहे. अनेकदा वादांमुळे त्या चर्चेत असतात. नुसरत सुंदर आणि स्टायलिश आहेत. म्हणूनचं त्या बऱ्याच वेळा वादात अडकतात. सध्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार त्यांच्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आल्या आहेत. नुसरतच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये नुसरत अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. नुसरत यांनी आपले सर्व फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नुसरतचा अंदाज पाहण्यासारखा आहे. या फोटोमध्ये नुसरत काळ्या लेदरच्या ब्रालेट आणि पॅन्टमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये नुसरतने 'लोक टक लावून पाहतील,' असं कॅप्शन दिलं आहे. नुसरतच्या चाहत्यांनी या फोटोंना लाईक तसेच कमेन्ट्स केल्या आहेत.

चित्रपटसृष्टीत आणि संसदेतील त्यांची जोडीदार मिमी चक्रवर्ती यांनीही नुसरतच्या फोटोंवर भाष्य करून फोटोची प्रशंसा केली आहे. या फोटोला मिमीने 'किलर' अशी प्रतिक्रिया दिली आहे. नुसरतचा SOS Kolkata हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा - Dakhancha Raja Jotiba Serial: 23 ऑक्टोबरपासून 'स्टार प्रवाह'वर सुरू होणार 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिका; 'हा' कलाकार साकारणार ज्योतिबाची भूमिका)

 

View this post on Instagram

 

"People will stare. Make it worth their while." ♥️ 📸 @siladitya_dutta 🎥 @bipradip_chakraborty 👗 @sandip3432 💇‍♀️ @sarmistha1992 💄 @makeupartist.sourab 😎 @avi_shakee #SOSKolkata #HarManboNa

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

या चित्रपटात मिमी चक्रवर्तीही दिसणार आहे. या चित्रपटात यश दासगुप्ता मुख्य भूमिका साकारणार आहेत. तसेच सब्यसाची चक्रवर्तीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असून नुसरतचे फोटोशूट त्याच थीमच्या अनुषंगाने करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

"People will stare. Make it worth their while." ♥️ 📸 @siladitya_dutta 🎥 @bipradip_chakraborty 👗 @sandip3432 💇‍♀️ @sarmistha1992 💄 @makeupartist.sourab 😎 @avi_shakee #SOSKolkata #HarManboNa

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

 

View this post on Instagram

 

"People will stare. Make it worth their while." ♥️ #SOSKolkata #HarManboNa 📸 @siladitya_dutta 🎥 @bipradip_chakraborty 👗 @sandip3432 💇‍♀️ @sarmistha1992 💄 @makeupartist.sourab 😎 @avi_shakee

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

नुसरतने सोशल मीडियावर SOS Kolkata चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंशुमन प्रत्युष हे करीत आहेत. याशिवाय प्रत्युष प्रॉडक्शन आणि जारेक प्रोडक्शन्स त्याची निर्मिती करत आहेत. आई दुर्गाच्या गेटअपमधील फोटोवरून काही दिवसांपूर्वी नुसरत वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. यावर काही मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतला होता. नुसरतने त्यांच्या परवानगीशिवाय जाहिरातीमध्ये छायाचित्रे वापरल्याबद्दल तक्रार केली होती.