Sushant Singh Rajput ला ड्रग्स पुरवठा करणार्‍या एका व्यक्तीसह 3 जणांना NCB कडून गोव्यात अटक

सध्या ईडी, सीबीआय आणि एनसीबी अशा 3 केंद्रीय यंत्रणा सुशांतच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी तपास करत आहेत.

NCB Zonal Director Sameer Wankhede (PC - ANI)

बॉलिवूडचा उमदा कलाकार सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) या जगातून अकाली एक्झिटमुळे अनेकांच्या मनाला चूटपूट लागली आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यू प्रकरणी मागील काही महिन्यांपासून केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे. अशामध्ये ड्रग्स कनेक्शन मध्ये तपास सुरू असताना आज एनसीबीने (NCB) गोव्यात (Goa) मोठी कारवाई केली आहे. एनसीबी टीमने गोव्यात 3 जणांना ड्रग्स तस्करी प्रकरणी अटक केली आहे. एनसीबी मुंबई झोनचे इन्चार्ज समिर वानखेडे (Samir Wankhede)  यांनी दिलेल्या माहितीमध्ये अटक केलेल्यांमध्ये एक जण सुशांत सिंह राजपूतला देखील ड्रग्सचा पुरवठा करत असल्याचं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच एनसीबीने कोर्टात सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे. सध्या ईडी, सीबीआय आणि एनसीबी अशा 3 केंद्रीय यंत्रणा सुशांतच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी तपास करत आहेत.

ANI Tweet

एनसीबीने एनडीपीएस कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह 33 जणांना आरोपी बनवलं आहे. दरम्यान सुशांतचा मृतदेह 14 जून दिवशी मुंबई मध्ये वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी आढळला होता. त्यानंतर मुंबई पोलिसंकडून हा तपास केंद्रीय तपास यंत्रणांना देण्यात आला आहे.