Dil Bechara Trailer Release Date: सुशांत सिंह राजपूत याचा चित्रपट 'दिल बेचारा'चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित
त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. पण सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समोर आलेले नाही. सुशांतला मोठ्या पडद्यावर शेवटचे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, संगीतकार ए.आर, रेहमान यांनी नुकतेच एक ट्विट करत दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती दिली आहे. ज्यामुळे सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांना उद्या दिल बेचारा या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळणार आहे.
सुशांतची शेवटची आठवण म्हणून त्याचा दिल बेचारा हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित व्हावा अशी मागणी चाहते करत होते. मात्र, चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही. कारण दिल बेचारा हा चित्रपट निर्मात्यांनी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल बेचारा हा चित्रपट येत्या २४ जुलैला ऑनलाईन प्रदर्शित होईल अशी माहिती हॉटस्टारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. मात्र, निर्मात्यांच्या या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित व्हावा, अशी मागणी चाहते सोशल मीडियाव्दारे करत आहेत. हे देखील वाचा- बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट च्या घरी आली नवीन पाहूणी; इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हणाली, आमच्या नवीन बाळाला भेटा
ए.आर. रेहमानचे ट्वीट-
कोरोनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रपटगृहांना उघडण्यास परवानगी नाकारली गेली आहे. ज्यामुळे अनेक चित्रपट निर्माते आपला सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत आहे.