Gangubai Kathiawadi च्या निर्मात्याला दररोज सहन करावे लागत आहे 3 लाख रुपयांचे नुकसान; काय आहे नेमकी या मागचं कारण, जाणून घ्या
चित्रपटाचा सेट न काढल्यामुळे सह-निर्माता संजय लीला भन्साळी आणि जयंतीलाल गाढा यांना दिवसाला 3 लाख रुपयांचा तोटा होत आहे.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण बॉलिवूड त्रस्त आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे, त्यामुळे शूटिंगवर बंदी आहे. यामुळे अनेक बड्या चित्रपटांचे शूटींग थांबले आहे. यात आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचाही समावेश आहे. एकीकडे चाहते आलियाच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे कोरोनामुळे शूटला उशीर होत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने या चित्रपटाचे शूटिंग थांबले होते.
स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, आलियाच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या शूटिंगचे केवळ 3 दिवस बाकी आहेत. यात आलिया भट्टवर चित्रित होणारे पार्श्वभूमी गाण्याचा समावेश आहे. या चित्रपटात आलियाशिवाय चित्रीकरण करण्यात आलेल्या लिपसिंकशिवाय गाणीही आहेत. संजय लीला भन्साळी यांना लवकरचं चित्रपटाचे शूटींग संपवायचे होते पण आलिया पॉझिटिव्ह असल्यामुळे, तर कधी लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबवावी लागली. जोपर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत नाही, तोपर्यंत फिल्म सिटीमध्ये त्याचा मोठा सेट तसाचं उभा आहे. (वाचा - अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; फोटो शेअर करत दिली माहिती)
दररोज 3 लाखांचे नुकसान
या वृत्तानुसार, चित्रपटाचा सेट न काढल्यामुळे सह-निर्माता संजय लीला भन्साळी आणि जयंतीलाल गाढा यांना दिवसाला 3 लाख रुपयांचा तोटा होत आहे. निर्माते पुन्हा शूटिंगचा धोका घेत नाहीत. लॉकडाउन संपल्यानंतर लगेचचं शूटिंग सुरू करण्यास भन्साळींनी नकार दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट संपेपर्यंत उर्वरित दृश्यांचे शूटिंग सुरू करणार नाही, असं निर्मात्याने म्हटलं आहे.
आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीचं वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर लोकांनी सांगितले की, हा चित्रपट कामठीपुराचा 200 वर्ष जुना इतिहास खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे. या चित्रपटात आलियासोबत अजय देवगनसुद्धा दिसणार आहे. अजयने त्याचे शूट पूर्ण केले आहे. हा चित्रपट 30 जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.