The Immortal Ashwatthama: बंद पडला Vicky Kaushal आणि Sara Ali Khan चा महत्त्वाकांक्षी चित्रपट 'द इमॉर्टल अश्वत्थामा'; निर्मात्यांना 30 कोटींचे नुकसान- Report
विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) स्टारर चित्रपट 'द इमॉर्टल ऑफ अश्वत्थामा' (The Immortal Ashwatthama) बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. हा चित्रपट एक महागडा, महत्त्वाकांक्षी चित्रपट समजला जात होता. मात्र आता या चित्रपटाबद्दल एक बातमी समोर येत आहे, जी नक्कीच विकी कौशल आणि सारा अली खानच्या चाहत्यांसाठी थोडी धक्कादायक असू शकते
विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) स्टारर चित्रपट 'द इमॉर्टल अश्वत्थामा' (The Immortal Ashwatthama) बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. हा चित्रपट एक महागडा, महत्त्वाकांक्षी चित्रपट समजला जात होता. मात्र आता या चित्रपटाबद्दल एक बातमी समोर येत आहे, जी नक्कीच विकी कौशल आणि सारा अली खानच्या चाहत्यांसाठी थोडी धक्कादायक असू शकते. माध्यमांमध्ये समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, 'द इमॉर्टल अश्वत्थामा' चित्रपट डब्ब्यात गेला आहे व हा चित्रपट बंद झाल्यामुळे निर्मात्यांना सुमारे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बॉलिवूड हंगामाने आपल्या एका अहवालात सांगितले आहे की, ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ हा चित्रपट बनवण्याची तयारी गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती. विकी कौशल आणि सारा अली खान स्टारर ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ बंद झाल्याच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री हैराण झाली आहे. हा चित्रपट बराच काळ चर्चेत होता, ज्याची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली होती. हा विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा चित्रपट ठरला असता, पण बजेटच्या अडचणींमुळे रॉनीने तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटात विकी कौशल एका सुपरहिरोच्या अवतारात दिसला असता.
या चित्रपटासाठी दिग्दर्शक आदित्य धर यांनी लोकेशन्सबाबत रेकीही केली होती. ते गेल्या अनेक महिन्यांपासून VFX टीमसोबत काम करत होते. जर प्री-प्रॉडक्शनच्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर, रॉनी स्क्रूवाला यांनी या प्रकल्पावर सुमारे 30 कोटी खर्च केले आहेत. (हेही वाचा: Tiger Shroff New House: अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईच्या पॉश परिसरात 31 कोटींमध्ये खरेदी केले तब्बल 8 BHK घर; जाणून घ्या काय आहेत सुविधा)
सूत्रांनी सांगितले की, ‘रॉनी स्क्रूवाला यांनी चित्रपटाच्या तयारीसाठी बरीच मोठी रक्कम खर्च केली होती व पुढेही ते खर्च करणार होते. परंतु जेव्हा त्यांनी संपूर्ण बजेट तपासले तेव्हा हा चित्रपट खूपच महागडा ठरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशात कोव्हिडमुळे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये व्यवसाय करू शकत नाहीत, त्यामुळे रॉनी स्क्रूवाला यांना जोखीम पत्करायची नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)