Sussanne Khan ने पार्टी मधील अटकेसंदर्भातील वृत्त फेटाळलं; सोशल मीडियावर शेअर केलं संपूर्ण स्टेटमेंट
सोमवारी रात्री मुंबई विमानतळाजवळील पबमध्ये पार्टी केल्यामुळे मुंबई पोलिसांनी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यासह बॉलिवूडच्या अनेक स्टार्सविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Sussanne Khan: महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाव्हायरस (Coronavirus) प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री मुंबई विमानतळाजवळील पबमध्ये पार्टी केल्यामुळे मुंबई पोलिसांनी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यासह बॉलिवूडच्या अनेक स्टार्सविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार पोलिसांनी या सर्वांना अटकदेखील केली होती. ज्यामध्ये हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान (Sussanne Khan) चेही नाव आहे. अशा परिस्थितीत आता सुझानने या संपूर्ण प्रकरणावर आपले मौन सोडले असून एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
अटकेची बातमी पूर्णपणे खोटी आहे, असे सुझानने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मी माझ्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेले होते. जिथे पोलिस आले आणि त्यांनी आम्हाला 3 तास थांबवले. पण आम्हाला अटक झाली नाही. पोलिसांनी आम्हाला का थांबण्यास सांगितले, याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती दिली गेली नव्हती. मला मुंबई पोलिसांबद्दल खूप आदर आहे. ते निस्वार्थ भावनेने मुंबईकरांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. (हेही वाचा - Rakul Preet Singh Tests Positive For COVID-19: बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)
मुंबई पोलिसांनी सुरेश रैना याच्यासह बर्याच सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल केला आहे. कारण, हे सर्व जण कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता पार्टी करत होते. पोलिसांनी या सर्वांविरूद्ध कलम 188, 269, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.