Sushant Singh Rajput's Demise: सुशांत सिंह राजपूत याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवले; पाहा संपूर्ण व्हिडिओ
या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तो 34 वर्षांचा होता.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तो 34 वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. 2013 मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. मात्र, त्याच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्काच लागला आहे. सुशांतचे राजपूत याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, त्याच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमल्याचे दिसत आहे.
सुशांत सिंह राजपूत याने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, एकेकाळी गाजलेल्या पवित्रा रिश्ता मालिकेतील मानव आणि महेंद्र सिंह धोनी याच्या जीवनावर अधारित चित्रपटाने त्याला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. परंतू, आज अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच त्याचे चाहते धास्तावून गेले आहेत. सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड कलाकार, राजकीय नेत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहली आहे. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput Death: केमिकल इंजिनिअरींग सोडली अन् अभिनय क्षेत्राकडे वळला; जाणून घ्या सुशांत सिंह राजपूत याचा जीवनप्रवास
व्हिडिओ-
सुशांत सिंह राजपूत याचे मृतहेद घराबाहेर काढताना-
सुशांत सिंह राजपूत याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना-
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला होता. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होत.