Sushant Singh Rajput च्या पहिल्या स्मृतीदिनी Pulkit Samrat, Kriti Sanon यांच्या भावूक पोस्ट

मागील वर्षी 14 जून रोजी दुपारी मुंबईतील वांद्रे येथील घरी सुशांत मृत अवस्थेत आढळला होता. आज पहिल्या स्मृतीदिन बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि अभिनेत्री कृती सनॉन (Kriti Sanon) यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Kriti Sanon, Sushant Singh Rajput & Pulkit Samrat (Photo Credits: Instagram)

Sushant Singh Rajput Death Anniversary: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा आज पहिला स्मृतीदिन. मागील वर्षी 14 जून रोजी दुपारी मुंबईतील वांद्रे येथील घरी सुशांत मृत अवस्थेत आढळला होता. वर्ष उलटले तरी अद्याप सुशांतच्या मृत्यूचा उलघडा झाला नाही. अद्याप सीबीआय आणि एनसीबीचा तपास सुरु आहे. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूचे गुढ उलघडणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, आज पहिल्या स्मृतीदिन त्याच्या मित्रपरिवाराने सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि अभिनेत्री कृती सनॉन (Kriti Sanon) यांनी खास पोस्ट केल्या आहेत.

सुशांतचा मित्र आणि बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) याने 'आम्ही तुला मिस करतो' असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तर पोस्टमध्ये सुशांतचा फोटो शेअर करत लिहिले की, तुला गमावल्याला आज पूर्ण एक वर्ष होत आहे आणि माझे मन मला आपल्या पुरस्कार सोहळ्यातील भेटीकडे नेत आहे. आपण हात मिळवला आणि आपल्या वाटेला लागलो. आठवणींची एक मजेदार गोष्ट म्हणजे त्या भावना उत्पन्न करतात. मला अजूनही तो क्षण आठवतो जेव्हा मला तु नसल्याची बातमी कळाली होती. त्यावेळेस माझे काहीतरी वैयक्तिक नुकसान झाल्यासारखे मला वाटले होते.

Pulkit Samrat Post:

 

View this post on Instagram

 

A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat)

पुलकित पुढे लिहितो, तुझ्या भेटीचा तो क्षण आज पुन्हा आठवत आहे. जगाने तुला गमावलं असेल पण आयुष्यात काही मोठे करु इच्छिणाऱ्या लोकांसाठी तू कायम प्रेरणादायी आहेस. छोट्याशा गावातून येऊन काही मोठे करु इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात तू आहेस. विनम्रता असलेल्या प्रत्येक माणसांत तू आहेस. तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी तुला ओळखले जाते. या आयुष्यात तुला जास्त जाणून घेऊ शकलो नाही. पण पुन्हा एकदा भेटलो तर त्या जीवनाचा भाग व्हायला मला आवडेल. सुशांत सिंह राजपूत, तुझी आठवण आम्हाला येते. (Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणीला दिलासा नाही, रिया चक्रवर्तीने दाखल केलेली FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार)

कृती सनॉनने सुशांत सिंह राजपूत सोबतचा व्हिडिओ चार दिवसांपूर्वी शेअर केला होता आणि खास पोस्ट करत या सिनेमाचा प्रवास नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहिल, असे म्हटले होते.

Kriti Sanon Post:

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

पुलकित आणि क्रितीच्या पोस्टवर चाहते कमेंट करुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सुशांतच्या अचानक एक्झिटने नातेवाईक, कलाकार आणि चाहते सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. दरम्यान, सुशांतच्या आठवणीत त्याच्या करिअरचा आढावा देणारी एक वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे.