Sushant Singh Rajput Case: अंकिता लोखंडे हिने First Kiss गाण्यावर बनवला व्हिडिओ, सुशांत राजपूत च्या चाहत्यांनी व्यक्त केला संताप

तर सुशांतच्या परिवारासह त्याच्या चाहत्यांकडून त्याच्या मृत्यू प्रकरणाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. परिवाराच्या या लढाईत सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंड (Ankita Lokhande) हिने सुद्धा साथ देण्याचे ठरवले आहे.

अंकिता लोखंडे (Photo Credits-Instagram)

Sushant Singh Rajput Case:  सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी देशातील 3 एजेंसी तपास करत आहेत. तर सुशांतच्या परिवारासह त्याच्या चाहत्यांकडून त्याच्या मृत्यू प्रकरणाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. परिवाराच्या या लढाईत सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंड (Ankita Lokhande) हिने सुद्धा साथ देण्याचे ठरवले आहे. मात्र आता अंकिता हिने असे काही केले आहे ज्यामुळे सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. खरंतर अंकिता लोखंडे सोशल मीडियात नेहमीच अॅक्टिव्ह असते. याच दरम्यान तिने गायक हनी सिंह याचे फर्स्ट किस (First Kiss) या गाण्यावर एक व्हिडिओ तयार करुन शेअर केला आहे. परंतु तिचा हा व्हिडिओ पाहून बहुतांश चाहत्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

अंकिता गाण्याची मजा घेताना दिसून येत आहे. परंतु तिचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंदीस पडलेला नाही. अशातच चाहत्यांनी सुशांतला विसरली आणि त्याला न्याय देण्यासाठी काय आहे असा सवाल ही उपस्थितीत केला आहे.(Ankita Lokhande झी रिश्ते पुरस्कार सोहळ्यात सुशांत सिंह राजपूत साठी करणार खास डान्स परफॉर्मन्स, व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

एका चाहत्याने अंकिता हिला स्वार्थी मुलगी असे संबोधित केले आहे. तर सुशांतच्या लग्नाला 6 महिने उलटले असून तु एकही पोस्ट केलेली नाही असे ही आणखी एका युजर्सने तिला म्हटले आहे.

दरम्यान, अंकिताच्या फर्स्ट किसच्या व्हिडिओला 75 हजार लोकांनी लाइक केले आहे. मात्र बहुतांश लोकांनी अंकितावर निशाणा साधल्याचे ही दिसून आले आहे.