सुहाना खान हिचा पार्टीतील जोशात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी ड्रेसवरुन उडवली खिल्ली (Video)

तसेच सुहाना हिचे फोटो आणि व्हिडिओमुळे ती सोशल मीडियात सक्रीय असल्याचे दिसून येते. तर नुकताच सुहानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

Suhana Khan (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड बादशहा शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. तसेच सुहाना हिचे फोटो आणि व्हिडिओमुळे ती सोशल मीडियात सक्रीय असल्याचे दिसून येते. तर नुकताच सुहानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी सुहाना एका लग्नात गेली होती. त्यावेळी तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो व्हायरल झाले होते. तर आता सुहाना हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एका पार्टीत जोशात डान्स करताना दिसून येत आहे. तर पहिल्यांदाच सुहाना एवढ्या उत्साहात डान्स करताना दिसली आहे.

तर व्हिडिओत सुहाना हिने सिल्वर कलरचा ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस घातला आहे. त्यामध्ये आपल्या मित्रपरिवारासह मस्ती करण्याच्या मूड मध्ये दिसत असून सुहानाचा लूक ग्लॅमरस दिसला आहे. मात्र नेटकऱ्यांनी तिच्या ड्रेसवरुन तिची खिल्ली उडवली आहे.

Shana in party mood (Photo Credits-Instagram)

काही युजर्सना तिचा लूक आवडला तर काही युजर्सनी तिला ड्रेसवरुन ट्रोल केले आहे. एका युजर्सने असे म्हटले आहे की, सुहाना नेहमीच अश्लील कपडे घालते. तर दुसऱ्याने शाहरुख याने त्याच्या मुलीवर अयोग्य संस्कार केले असल्याचे म्हटले आहे.

(सुहाना खान हिच्या हॉट ट्रेडिशनल लूकची सोशल मीडियात चर्चा; पहा Viral Photos)

सुहाना हिने अद्याप बॉलिवूडमध्ये डेब्यू केला नाही आहे. मात्र सोशल मीडियात सुहाना हिचे चाहते प्रचंड प्रमाणात आहेत.