Madhuri Dixit Single Candle: माधुरी दीक्षितचे गायनामध्ये पदार्पण; वाढदिवसादिवशी शेअर केली आपल्या पहिल्या वहिल्या गाण्याची झलक (Watch Video)
धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करीत आहे. सकाळपासून माधुरी दीक्षितवर इतर सेलेब्रिटी आणि चाहते यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Madhuri Dixit Candle Song: धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करीत आहे. सकाळपासून माधुरी दीक्षितवर इतर सेलेब्रिटी आणि चाहते यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता माधुरी दीक्षितने तिच्या चाहत्यांना या खास दिवशी एक गिफ्ट दिले आहे. माधुरी लवकरच गायनाच्या क्षेत्रात डेब्यू करणार आहे. माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर या गाण्याची, Candle ची झलक असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षितने सांगितले आहे की, लवकरच ती तिचे पहिले गाणे घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
पहा माधुरी दीक्षित ट्वीट -
Thanks for all the good wishes and birthday love! Wanted to give some love back to you. Sharing an exclusive preview of my first ever single. Will share the song soon. It's called Candle and it's about hope, something we need in large supply right now. pic.twitter.com/gmSTmt3KrJ
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) May 15, 2020
आपल्या पोस्टमध्ये माधुरी लिहिते, 'आपण दिलेल्या सर्व शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या प्रेमाबद्दल धन्यवाद! आता आपल्याला थोडे प्रेम देऊ इच्छित आहे. माझ्या पहिल्या गाण्याची झलक मी सादर करीत आहे व लवकरच पूर्ण गाणे शेअर करेन. या गाण्याचे नाव Candle असे असून, हे आशेबद्दल आहे, ज्याची आपल्याला सध्या मोठ्या प्रमाणात गरज आहे.' हे गाणे इंग्रजी भाषेत असून, आता चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दल उत्सुकता दिसून येत आहे. (हेही वाचा: अशी घडली माधुरी! धक धक गर्लच्या बॉलिवूड प्रवासाचा फ्लॅशबॅक)
काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितने आय फॉर इंडिया ‘I for India’ कार्यक्रमात एक गाणे गायले होते. माधुरी दीक्षितने हॉलिवूड गायक Ed Sheeran चे गाणे गायले होते, तर तिच्या मुलाने पियानो वाजविला होता. माधुरीच्या त्या गाण्यालाही लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, माधुरीने 1984 मध्ये 'अबोध' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. माधुरीला आतापर्यंत सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले असून पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. माधुरीला फोर्ब्स इंडियाच्या टॉप मूव्ही स्टार्स आणि व्होग बॉलीवूड ब्यूटी लीजेंड अवॉर्डनेही सन्मानित केले गेले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2020 08:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

