SP Balasubrahmanyam Funeral: दिग्गज गायक एसपी बालासुब्रमण्यम यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप; पहा फोटोज
शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी एमजीएम रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
दिग्गज गायक एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांच्यावर आज (26 सप्टेंबर) चेन्नईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी एमजीएम रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यानंतर बालासुब्रमण्यम यांचे पार्थिव त्यांच्या फार्महाऊसवर अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साऊथ आणि हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी हजारो गाणी गायली आहेत. 74 वर्षीय एसपी बालासुब्रमण्यम यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी त्यांना चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते.
प्राप्त माहितीनुसार, तामिळनाडू पोलिसांकडून 24 बंदुकांची सलामी देण्यात आली. यावेळेस त्यांचे कुटुंबिय आणि संबंधित व्यक्ती उपस्थित होते. तर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहते देखील हजेरी लावली होती. ('मेरे रंग मैं रंगनेवाली', 'पहला पहला प्यार' ते ''साथिया तुने क्या किया' एस पी बालसुब्रमण्यम यांची ही एव्हरग्रीन गाणी ते सलमान खान साठी बेस्ट पार्श्वगायक असल्याचा आहेत पुरावा!)
PTI Tweet:
पहा फोटोज:
एसपी बालासुब्रमण्यम यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी हजारो चाहते प्रार्थना करत होते. मात्र अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सलमान खान, आमिर खान, लता मंगेशकर, सोनू निगम यांच्या समवेत अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
एस पी बालासुब्रमण्यम यांनी आपल्या 50 वर्षांच्या गायन कारकीर्दीत तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अशा भाषांमध्ये गाणी गायली होती. बालासुब्रमण्यम यांना त्यांना 6 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर 2001 मध्ये पद्मश्री आणि 2011 मध्ये पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.