Shraddha Kapoor Surpasses PM Modi: 'वो स्त्री है कुछ भी कर सकती है', श्रद्धा कपूरने पंतप्रधान मोदींना मागे टाकले; बनली सर्वाधिक फॉलो होणारी तिसरी इंस्टाग्राम सेलिब्रिटी

स्त्री 2 च्या यशामुळे श्रद्धा कपूरची लोकप्रियता इतकी वाढली की तिने इंस्टाग्रामवर फोलॉअर्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागे टाकत सक्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे.

Photo Credit- X

Shraddha Kapoor Surpasses PM Modi: बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor) सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री 2 च्या यशात आहे. या चित्रपटाने 6 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. स्त्री 2 च्या यशामुळे श्रद्धा कपूरची लोकप्रियता आणखी वाढली. त्याचा परिणाम म्हणून सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (most followed celebrity on Instagram)श्रद्धा कपूरच्या फोलॉअर्समध्ये भर पडली आणि तिने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना(Narendra Modi) मागे टाकत सक्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. (हेही वाचा:Most Followed Asian Celeb on Instagram: इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स यादीत विराट कोहली आशियाई सेलिब्रिटींमध्ये अव्वल, गाठला 75 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा )

अभिनेत्रीच्या फॉलोअर्सची संख्या इतकी वाढली आहे की अभिनेत्रीने अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मागे टाकले आहे. श्रद्धा कपूर स्टारर हॉरर कॉमेडी 'स्त्री' चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. आज 21 ऑगस्टला चित्रपटाचा पहिला आठवडा पूर्ण झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत आहे. तिसऱ्या क्रमांकावर पोहोचल्यानंतर श्रद्धा कपूरचे इंस्टाग्रामवर 91.4 मिलीयन फोलॉअर्स झाले आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेले पंतप्रधान मोदी यांचे 91.3 मिलीयन फोलॉअर्सआहेत. दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने 91.8 मिलीयन फोलॉअर्ससह आपले स्थान अबाधित ठेवले आहे. (हेही वाचा:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इन्स्टाग्रावरील फॉलोअर्सची संख्या 30 दशलक्षच्या घरात)

अभिनेत्री आलिया भट्ट 85.1 मिलीयन फोलॉअर्ससह पाचव्या स्थानावर आहे. कतरिना कैफ 80.4 मिलीयन फोलॉअर्स सह सहाव्या स्थानावर आहे. दीपिका पदुकोण 79.8 मिलीयन फोलॉअर्ससह सातव्या स्थानावर आहे. तर भारतातील सर्वाधिक फोलॉअर्स असलेला स्टार क्रिकेटर विराट कोहली 271 मिलीयन फोलॉअर्ससह पहिल्या स्थानावर आहे.

श्रद्धा कपूरची खास पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

दरम्यान, स्त्री 2 चित्रपटाच्या 6 दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोललो तर तो 300 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. त्याचवेळी, जॉन अब्राहमचा वेद चित्रपट आणि अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट 15 ऑगस्ट रोजी स्त्री 2 सोबत प्रदर्शित झाला मात्र खेल खेल मैं कमाईच्या बाबतीत खूपच मागे पडला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now