Most Followed Asian Celeb on Instagram: इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स यादीत विराट कोहली आशियाई सेलिब्रिटींमध्ये अव्वल, गाठला 75 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा

भारतीय कर्णधार विराट कोहली इन्स्टाग्रामवर 75 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार करणारा पहिला आशियाई सेलिब्रिटी बनला आहे. विराट अव्वल स्थानावर असून त्याच्या मागे बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोन टॉप-3 मध्ये आहेत. प्रियंका 56 लाख फॉलोअर्स, तर दीपिकाने 52 फॉलोअर्ससह आशियाई सेलिब्रिटींच्या लिस्टमध्ये स्थान मिळवले आहेत.

Most Followed Asian Celeb on Instagram: इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स यादीत विराट कोहली आशियाई सेलिब्रिटींमध्ये अव्वल, गाठला 75 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा
विराट कोहली (Photo Credit: Getty)

भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इन्स्टाग्रामवर 75 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार करणारा पहिला आशियाई सेलिब्रिटी बनला (Most Followed Asian Celeb on Instagram) आहे. भारतीय क्रिकेटपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी आणि नेमार ज्युनियर यांच्या मागे सोशल मीडिया साईटवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा जगातील चौथे क्रमांक लागणारा खेळाडू आहे. देशभरातील खेळाच्या अफाट लोकप्रियतेमुळे भारतीय क्रिकेटपटूंना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात फॉलो केले जाते. कोरोना व्हायरसमुळे मार्चपासून कोहली क्रिकेट खेळपट्टीवर पाऊल ठेवू शकला नाही आणि सोशल ब्लेडच्या म्हणण्यानुसार गेल्या 30 दिवसांत त्याने पाच लाखहून अधिक फॉलोअर्स जमा केले आहेत. विराट अव्वल स्थानावर असून त्याच्या मागे बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि दीपिका पादुकोन (Deepika Padukone) टॉप-3 मध्ये आहेत. प्रियंका 56 लाख फॉलोअर्स, तर दीपिकाने 52 फॉलोअर्ससह आशियाई सेलिब्रिटींच्या लिस्टमध्ये स्थान मिळवले आहेत. (Virat Kohli-Anushka Sharma announce Pregnancy: विराट कोहली-अनुष्का शर्माच्या घरी हलणार पाळणा, फोटो शेअर करत चाहत्यांसह शेअर केली 'गुड-न्यूज')

75,719,390 फॉलोअर्स असलेला कोहली जगभरात इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत 26 व्या क्रमांकावर आहे. आरसीबीच्या कॅप्टनचा एंगेजमेंट रेट 4.11 टक्के आहे आणि त्याच्या पोस्टवर सरासरी 3 लाखहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. फेसबुकवर कोहलीचे43,283,195चे अफाट फॉलोअर्स आहेत, तर ट्विटरवर 37.4 मिलियन इतके फॉलोअर्स आहेत.

कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक मानधन मिळालेल्या खेळाडूंच्या यादीत एकूण 26 लाख अमेरिकन डॉलर्सची कमाईसह तो यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय आहे. 'अटिने' ने जमा केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी 12 मार्च ते 14 मे दरम्यान इंस्टाग्रामवर त्याच्या प्रायोजित पोस्टच्या माध्यमातून क्रिकेटरने तब्बल 379,294 पौंड इतकी कमाई केली. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा कर्णधार असलेला कोहली सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या आवृत्तीसाठी सज्ज झाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2020 04:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).