बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी 13 वर्षांनंतर 'निकम्मा' चित्रपटातून करणार कमबॅक

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी 13 वर्षांनंतर 'निकम्मा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

Shilpa Shetty (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) 13 वर्षांनंतर 'निकम्मा' चित्रपटातून (Nikamma Movie) बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. शिल्पाने 2007 मध्ये 'अपने' या चित्रपटात काम केले होते. शिल्पाने बॉलिवूडमधून उसंत घेतली होती. मात्र, तरी ती छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमात सहभागी होती. शिल्पाने फिटनेसचे महत्त्व लक्षात घेऊन आपले स्वत: चे योगा अॅप सुरू केले. निकम्मा चित्रपटातील शिल्पाची भूमिका पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

शिल्पाने आपल्या इंन्टाग्राम अकाउंटवरून तिच्या पुनरागमनाची बातमी सांगितली आहे. यात तिने एका वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचा फोटो शेअर केला आहे. यात तिने 'निकम्मा' या चित्रपटातून सेकंड इनिंग सुरू करत असल्याचे सांगितले आहे. मी आता 13 वर्षांच्या विश्रांतीला मी ब्रेक देणार आहे. माझ्या सेकंड इनिंगमधल्या या पहिल्या चित्रपटासाठी मी फार उत्सुक आहे. माझ्या आगामी 'निकम्मा' या चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खान करणार आहे. माझ्यासोबत या चित्रपटाच अभिमन्यू दसानी आणि शिर्ले सेतियाही दिसणार आहेत,' असंही शिल्पाने म्हटलंय. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने धुडकावली 10 कोटींची जाहिरात, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण)

 

View this post on Instagram

 

Yesssssssss, it’s true! My sabbatical of 13 long years comes to an end.. I am so excited to announce that the film you will see me next in is #Nikamma , directed by @sabbir24x7 (cast still being finalised) featuring these amazing and talented actors @abhimanyud @shirleysetia @sonypicturesin. Need all your blessings 🙏😇 and Thank you for all the love always💗 #SabbirKhanFilms #ShilpaShettyInNikamma #gratitude #doingwhatilove #lovewhatido #films #backwithabang #love #announcement #bombaytimes

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

 

View this post on Instagram

 

Super excited to announce that #Nikamma is releasing on 5th June, 2020. Have had such an amazing experience working with @sabbir24x7, @abhimanyud & @ShirleySetia, and now, I can’t wait for you guys to watch it! Mark the date! See you in the theatres! 🤗😘🧿❤ . @sonypicturesin @sonypicsprodns . Posted @withrepost • @sabbir24x7 NIKAMMA ... Arriving on 5th June 2020. Get ready to meet this lovable couple and of course the sassy Shilpa Shetty who makes a comeback to the screen after 13 years. Nikamma once again gives me a chance to say a big story with rank newcomers, bring their talent to the fore and give them a platform. This also marks my first as a producer in collaboration with Sony pictures so super excited to bring this to you in the new year !!! @theshilpashetty @abhimanyud @shirleysetia @sonypicturesin

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

शिल्पाची मुख्य भूमिका असणारा 'निकम्मा' हा चित्रपट 5 जून 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 13 वर्ष बॉलिवूडपासून दूर असलेल्या शिल्पाने मध्यंतरीच्या काळात अनेक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच अनेक सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊन तिने लोकांना योगा करण्याचे महत्त्व पटवून दिले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now