Tunisha Sharma Death Case: शीजानने तिला इस्लामचे पालन करण्यास भाग पाडले; तुनिशाच्या आईचा आरोप
शीजानला शिक्षा होईपर्यंत मी गप्प बसणार नाही, असेही वनिता यांनी सांगितले. तुनिषाने एकदा त्याचा फोन तपासला होता, त्यानंतर तिला शीजन तिची फसवणूक करत असल्याचं समजलं होत. याबाबत तिने शीजानला विचारले असता त्याने तिला चापट मारली. मी शीजानला माफ करणार नाही.
Tunisha Sharma Death Case: तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा (Vanita Sharma) यांनी यापूर्वीच आपल्या मुलीचा सहकलाकार शीझान खानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. शीजान खान पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात सातत्याने सक्रिय आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शीझान खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
तुनिशाला इस्लामचे पालन करण्यास पाडले भाग -
दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, शीजन तिच्या मुलीची फसवणूक करत आहे. त्या म्हणाला की, तुनिशाने त्यांना सांगितले होते की शीजान ड्रग्स सेवन करतो. शीजानने तुनिशाला इस्लाम धर्माचे पालन करण्यास भाग पाडले. (हेही वाचा - Tunisha Sharma Suicide Case: टेलिव्हिजन अभिनेता शीझान खानला कठोर शिक्षा करण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी)
शीजानला शिक्षा होईपर्यंत मी गप्प बसणार नाही, असेही वनिता यांनी सांगितले. तुनिषाने एकदा त्याचा फोन तपासला होता, त्यानंतर तिला शीजन तिची फसवणूक करत असल्याचं समजलं होत. याबाबत तिने शीजानला विचारले असता त्याने तिला चापट मारली. मी शीजानला माफ करणार नाही.
शीजनचे कुटुंबीय ब्लॅकमेल करायचे
वनिता शर्मा इथेच थांबल्या नाहीत. शीजनने अनेक महिने आपल्या मुलीचा वापर केल्याचेही त्यांनी सांगितले. वनिता शर्माचा आरोप आहे की, शीजन आणि त्याच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीला आपल्या आयुष्यात इतके गुंतवून ठेवले आहे की ती माझ्यापासून दूर गेली. जर तो दुसऱ्या रिलेशशीपमध्ये होता तर त्याने माझ्या मुलीला याबद्दल सांगायला हवे होते. तुनिशाला फसवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. शीजनने तुनिशाला उर्दू शिकवण्यास भाग पाडले. त्यानंतर ती उर्दू बोलू लागली.
Sheezan took her from the room but did not call the Ambulance. This can also be a murder... Sheezan forced her to wear Hijab as well: Vanita Sharma, Tunisha’s mother pic.twitter.com/29fsAzoEAY
— ANI (@ANI) December 30, 2022
शीझान खानवर आरोपांचा वर्षाव करताना वनिता शर्माने हेही उघड केले की, तुनिशाच्या मृत्यूच्या वेळी त्याने तिला खोलीतून बाहेर काढले, परंतु रुग्णवाहिका बोलावली नाही.
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 02:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

