चंदीगडमध्ये Jersey सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात; शाहिद कपूरने शेअर केला फोटो

चंदीगडमध्ये 'जर्सी' (Jersey) सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. शाहिदने यासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या चित्रपटात शाहिद मुख्य भूमिका साकारणार आहे. शाहिदच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे या चित्रपटाचे शुटींग लांबले होते. परंतु, आता शाहिद सेटवर हजर झाला आहे. 'जर्सी' हा चित्रपट तेलगु चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर, पंकज कपूर, मृणाल ठाकूर यांच्याही भूमिका असणार आहे.

Shahid Kapoor Start Jersey Movie Shooting (PC- Instagram)

चंदीगडमध्ये 'जर्सी' (Jersey) सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) यासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या चित्रपटात शाहिद मुख्य भूमिका साकारणार आहे. शाहिदच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे या चित्रपटाचे शुटींग लांबले होते. परंतु, आता शाहिद सेटवर हजर झाला आहे. 'जर्सी' हा चित्रपट तेलगु चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर, पंकज कपूर, मृणाल ठाकूर यांच्याही भूमिका असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात पंकज कपूर (Pankaj Kapoor) शाहिद कपूरच्या कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. याअगोदर 2015 मध्ये 'शानदार' चित्रपटात शाहिद आणि पंकज कपूर एकत्र दिसले होते. तसेच 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मौसम' चित्रपटाचे दिग्दर्शन पंकज कपूर यांनी केले होते. (हेही वाचा - तब्बल 16 वर्षानंतर शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या 'इश्क विश्क'चित्रपटाचा सिक्वल येणार)

 

View this post on Instagram

 

It’s never too late to chase your dream. #Jersey . . The journey begins. @GowtamNaidu @MrunalOfficial2016 @ItsAlluAravind @AmanTheGill @SriVenkateshwaraCreations

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

पुढच्या वर्षी 28 ऑगस्ट 2020 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिकेटवर आधारित असलेला हा चित्रपट 'भारतीय क्रिडा दिवसा'च्या एक दिवसअगोदर प्रदर्शित होणार आहे. शाहिदचा 'कबीर सिंह' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता 'जर्सी' चित्रपटात शाहिदची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानौरी हे करत आहेत. तिन्नानौरी यांनीच 'जर्सी' या तेलगु चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 

View this post on Instagram

 

#jersey #prep

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

दरम्यान, पंकज कपूर 2015 नंतर वेब प्लॅटफॉर्मवर 'टोबा टेक सिंह' मध्ये झळकले होते. आता 5 वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांचा 'जर्सी' हा चित्रपट येत आहे. 'जर्सी' या चित्रपटात पंकज आणि शाहिद कपूर या पिता-पुत्रांना एकत्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now