Mumbai Goa Cruise Drug Party: Shah Rukh Khan चा लेक Aryan Khan सह 8 जण चौकशीसाठी ताब्यात; एनसीबी मुंबई संचालक Sameer Wankhede यांची माहिती
समिर वानखेडेंनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टी मधून ताब्यात घेण्यात आलेल्या ड्र्ग्स मध्ये कोकेन (Cocaine), गांजा (Ganja), MD आणि अन्य नशा निर्माण करणार्या पदार्थांना जप्त करण्यात आले आहे.
मुंबई मध्ये ठिकठिकाणी एनसीबीने धाडी टाकत ड्र्ग्स रॅकेट उघडल्यानंतर काल रात्री Narcotics Control Bureau कडून मुंबई-गोवा क्रुझ वरील एका रेव्ह पार्टीवर देखील धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूड स्टार शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) लेक आर्यन खान (Aryaan Khan) चं देखील नाव आहे. एनसीबीने आर्यन खान सह 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. एनसीबी Mumbai Director Sameer Wankhede यांनी दिलेल्या माहितीनुसार, Aryaan Khan, Arbaaz Merchant, Munmun Dhamecha, Nupur Sarika, Ismeet Singh, Mohak Jaswal, Vikrant Chhoker, Gomit Chopra यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान हा पार्टीचा एक भाग होता. त्याला एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे ड्रग्स मिळालेले नाही. आर्यन सोबतच अजून काही स्टार किड्सची यामध्ये नावं आहेत.
ANI Tweet
Eight persons -- Aryaan Khan, Arbaaz Merchant, Munmun Dhamecha, Nupur Sarika, Ismeet Singh, Mohak Jaswal, Vikrant Chhoker, Gomit Chopra -- are being questioned in connection with the raid at an alleged rave party at a cruise off Mumbai coast: NCB Mumbai Director Sameer Wankhede pic.twitter.com/KauOH2ULts
— ANI (@ANI) October 3, 2021
सूत्रांच्या माहितीनुसार एनसीबी कडून आर्यनचा फोन ताब्यात घेण्यात आला असून त्याच्या चॅट्सद्वारा माहिती मिळवली जात आहे. त्याने ड्रस घेतले आहे का? मागवले आहे का? याचा धागादोरा मिळवण्याचा प्रयत्न आहे. समीर वानखेडेंनी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही असं म्हटलं आहे. मात्र क्रुझ वरून ड्रग्स ताब्यात घेण्यात आली आहेत.
समिर वानखेडेंनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टी मधून ताब्यात घेण्यात आलेल्या ड्र्ग्स मध्ये कोकेन (Cocaine), गांजा (Ganja), MD आणि अन्य नशा निर्माण करणार्या पदार्थांचा समावेश आहे. मुंबई-गोवा क्रुझ वर शेकडो प्रवासी होते आणि ते गोव्याकडे कूच करत होते.
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2021 11:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

