Shah Rukh Khan व Gauri Khan यांचे दिल्लीतील लक्झरी घर Air BnB वर उपलब्ध; किंग खानच्या घरात Valentine's Day 2021 साजरी करण्याची संधी, जाणून घ्या कसे
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचे मुंबईमधील अलिशान घर, ‘मन्नत’ आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु राजधानी दिल्लीतही शाहरुखचे एक सुंदर घर आहे. किंग खानचा जन्म दिल्लीतच झाला होता, तो लहानाचा मोठाही दिल्लीमध्येच झाला आहे.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचे मुंबईमधील अलिशान घर, ‘मन्नत’ आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु राजधानी दिल्लीतही शाहरुखचे एक सुंदर घर आहे. किंग खानचा जन्म दिल्लीतच झाला होता, तो लहानाचा मोठाही दिल्लीमध्येच झाला आहे. आता हे घर त्याची पत्नी गौरी खानने (Gauri Khan) पुन्हा रिडिझाइन केले आहे. शाहरुखच्या आठवणी आणि त्याच्या फोटोनी गौरीने हे घर खरोखरच सुंदर सजवले आहे. सर्वात मजेची गोष्ट म्हणजे शाहरुख-गौरीने सर्वसामान्यांसाठी या घराचे दरवाजे उघडले आहेत. शाहरुख खान आणि गौरी खान चाहत्यांना त्यांच्या दिल्लीतील लक्झरी घरात राहण्याची संधी देऊ करत आहेत.
शाहरुखच्या घरात राहण्यासाठी आपल्याला एक स्पर्धा जिंकणे आवश्यक आहे. गौरीने एका ट्रॅव्हल ब्रँडच्या भागीदारीत चाहत्यांना त्यांच्या दिल्लीतील घरी राहण्याची संधी दिली आहे. शाहरुख खानने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये खुलासा केला आहे की, इंटिरियर डिझायनर असलेल्या गौरी खानने अलीकडेच दिल्लीतील आपले घर पुन्हा डिझाइन केले आहे. गौरीने या घरासाठी एअर बीएनबी (Air BnB)शी भागीदारी केली असून, त्यांचे हे घर वेबसाइटवर ठेवले आहे.
शाहरुखच्या घरात राहण्यासाठीची स्पर्धा आता सुरु झाली असून, ती 30 नोव्हेंबर रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत असेल. यासाठी आपल्याला आपला अर्ज पाठवावा लागेल. होम विथ ओपन आर्मस (Home With Open Arms) नावाची ही माहीम असून त्याद्वारे तुम्हाला शाहरुखच्या घरात राहण्याची संधी मिळेल. यामध्ये आपल्याला सांगायचे आहे की, आपल्यासाठी होम विथ ओपन आर्मस म्हणजे नक्की काय? घरापासून दूर असल्यावर आपले स्वागत कशाप्रकारे करणे अपेक्षित आहे? या प्रश्नांचे उत्तर देणाऱ्या नशीबवान माणसाला शाहरुखच्या घरात राहण्याची संधी मिळेल. (हेही वाचा: Viral Video: सैफ अली खान आणि करीन कपूर सह मुलगा तैमुर ने गायले Birthday Song, पाहा व्हायरल व्हिडिओ)
यासाठी लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे एअर बीएनबी खाते असणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला पैसे भरणे किंवा काही खरेदी करण्याची गरज नाही. विजेत्यांना शाहरुखच्या दिल्लीतील घरी 13 फेब्रुवारी (दुपारी 12) ते 14 फेब्रुवारी (दुपारी 12) पर्यंत राहण्याची संधी मिळेल. तर अशा प्रकारे ही स्पर्धा जिंकून तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे इथे साजरा करू शकता.