Saaho Song Enni Soni: प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची रोमँटीक केमिस्ट्री असलेले 'साहो' सिनेमातील 'इन्नी सोनी' गाणे आऊट! (Watch Video)
या गाण्यात आपल्याला प्रभास-श्रद्धा यांचा रोमँटीक अंदाज पाहायला मिळत आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (South Superstar Prabhas) याच्या साहो (Saaho) सिनेमाची चाहते अगदी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा हा सिनेमा 30 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी सिनेमातील दुसरे गाणे इन्नी सोनी (Enni Soni) प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आपल्याला प्रभास-श्रद्धा यांचा रोमँटीक अंदाज पाहायला मिळत आहे.
गुरु रंधावा (Guru Randhawa) आणि तुलसी कुमार (Tulsi Kumar) यांनी हे गाणे गायले असून गुरु रंधावा यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे.
यापूर्वी साहो सिनेमातील सायको सइयां हे गाणे रसिकांच्या भेटीला आले होते. या गाण्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता सिनेमातील दुसरे गाणे रसिकांना मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाले आहे. या नव्या गाण्यात प्रभास-श्रद्धाची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ('साहो' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज! प्रभास च्या रुपात लवकरच लाँच होणार 'Saaho The Game')
पहा व्हिडिओ:
साहो सिनेमा यापूर्वी 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र अक्षय कुमार याच्या मिशन मंगल आणि जॉन अब्राहम याच्या बाटला हाऊस या सिनेमांची होणारी टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी साहो सिनेमाची रिलिज डेट पुढे ढकलली. (प्रभास याच्या 'साहो' सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर; अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्या सिनेमांशी टळली टक्कर)
प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्यासह या सिनेमात नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, महेश मांजरेकर, एवलिन शर्मा यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हिंदी सोबतच हा सिनेमा तामिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.