Ram Mandir Consecration: RRR अभिनेते राम चरणला मिळालं राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणेचे निमंत्रण, पाहुण्यांच्या यादीत 'या' साऊथ सेलिब्रिटींचाही समावेश
फोटोमध्ये राम चरणच्या हातात या विशेष कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रही दिसत आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'आरआरआरआर' चित्रपटात भगवान रामाच्या प्रतिमेत दिसणारे राम चरण या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.
Ram Mandir Consecration: सध्या राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत (Pran Pratishtha Ceremony) सर्वच चर्चा सुरू आहे. अयोध्येत (Ayodhya) होणाऱ्या या दिमाखदार कार्यक्रमासाठी सिनेजगतातील सर्व सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आता ग्लोबल स्टार राम चरण (Ram Charan) आणि त्यांची पत्नी उपासना यांना 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण मिळाले आहे. 12 जानेवारी रोजी आरएसएस नेते सुनील आंबेकर यांनी व्यक्तिश: राम चरणला निमंत्रण दिले आहे.
अभिनेत्याला निमंत्रण देण्यासाठी सुनील आंबेकर हैदराबाद येथील अभिनेत्याच्या घरी गेले. या प्रसंगाचा ताजा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये राम, उपासना आणि सुनील एकत्र दिसत आहेत. या कार्यक्रमाला केवळ भाविकच नाही तर सेलिब्रिटी, राजकीय नेते, उद्योगपती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. (हेही वाचा -Jai Shree Ram Tsunami For Hanuman: 'हनुमान' चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, थिएटरमध्ये 'जय श्री राम'च्या घोषणा (Watch Video))
फोटोमध्ये राम चरणच्या हातात या विशेष कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रही दिसत आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'आरआरआरआर' चित्रपटात भगवान रामाच्या प्रतिमेत दिसणारे राम चरण या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Ram Temple Inauguration: रणदीप हुड्डा यांना अयोध्येतील 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याचे मिळाले निमंत्रण)
येत्या 22 जानेवारीची तारीख भारतीय इतिहासात सुवर्ण तारीख म्हणून नोंदवली जाणार आहे. या दिवशी उत्तर प्रदेशातील अयोध्येत बांधलेल्या भव्य राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये देशभरातील राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा मेळा भरणार आहे.
या साऊथ सेलिब्रिटींनाही मिळाले आमंत्रण -
राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळालेले राम चरण हे पहिले नाव नाही. राम चरणपूर्वी दिग्गज अभिनेते रजनीकांत आणि धनुष यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. इतकंच नाही तर अजय देवगण, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित आणि रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना राम मंदिर उद्धाटनाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)