बॉलिवूड अभिनेत्री Sonam Kapoor च्या घरावर दरोडा; दागिन्यांसह 1.41 कोटींची चोरी

सर्वांची चौकशी केली जात आहे.

Sonam Kapoor (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) च्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. सोनम कपूरच्या सासूने तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तुघलक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. हे प्रकरण अत्यंत हायप्रोफाईल असल्याने नवी दिल्ली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेत अनेक पथके तयार केली आहेत. सोनम कपूरच्या घरात 25 नोकरांशिवाय 9 केअर टेकर, ड्रायव्हर आणि माळी आणि इतर कर्मचारीही घरात काम करतात. पोलिस सर्वांची चौकशी करत आहेत. क्राइम टीम व्यतिरिक्त एफएसएल टीम पुरावे गोळा करत आहे. अद्यापपर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही.

नवी दिल्ली जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोनम कपूरचे सासरे 22 अमृता शेरगिल मार्गावर राहतात. येथे त्यांची आजी सासू सरला आहुजा (86), मुलगा हरीश आहुजा आणि सून प्रिया आहुजा यांच्यासोबत राहतात. सरला आहुजा यांनी व्यवस्थापक रितेश गौरासोबत 23 फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलिस स्टेशन गाठले. त्यांनी त्यांच्या खोलीतील अलमिरामधून 1.40 लाख रुपयांचे दागिने आणि 1 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. त्यांनी 11 फेब्रुवारी रोजी अलमिराची तपासणी केली असता दागिने आणि रोख रक्कम गायब होती. सरला आहुजाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिने सुमारे दोन वर्षांपूर्वी दागिने तपासले होते. त्यानंतर ते कपाटात ठेवले होते. (हेही वाचा - Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: अखेर ठरलं! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात; तीन दिवस चालणार लग्नाचे कार्यक्रम)

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात जवळपास 25 नोकर आणि 9 केअरटेकर आहेत. सर्वांची चौकशी केली जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही. अशा परिस्थितीत पोलिस फॉरेन्सिक सायन्सची मदत घेण्याचा विचार करत आहेत. रितेश गौराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा (एफआयआर क्र. 41/22) नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस आता एक वर्षाचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तुघलक रोड पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत. सोनम कपूरचा पती आनंद आहुजा काका सुनीलसोबत कॅलिफोर्नियामध्ये राहतो. तो वारंवार येतो आणि जातो. पीडित कुटुंबाची साई एक्सपोर्ट्स या कपड्यांची कंपनी आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरला आहुजा 1961 मध्ये शिलाई मशीनने महिलांचे कपडे शिवत असे. एकदा त्यांनी महिलांचे कापड शिवले होते. एका ग्राहकाला हे कापड खूप आवडले. असे सांगितले जात आहे की, ग्राहकाने आणखी चार महिलांचे कपडे शिवून घेतले. यानंतर सरला आहुजाचा कपड्यांचा व्यवसाय सुरू झाला. आज त्यांचा जगभरात कपड्यांचा व्यवसाय आहे.