Gully Boy Song: 'Apna Time Aayega' म्हणत रणवीर सिंगचे रॅपसॉन्ग रसिकांच्या भेटीला!
'सिम्बा'च्या धमाकेदार यशानंतर रणवीर सिंगच्या चाहत्यांना 'गली बॉय' या त्याच्या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे.
Gully Boy Song : 'सिम्बा'च्या धमाकेदार यशानंतर रणवीर सिंगच्या चाहत्यांना 'गली बॉय' (Gully Boy) या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर 'गली बॉय' सिनेमाच्या टीझर, ट्रेलरनंतर सिनेमातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'अपना टाईम आयेगा' (Apna Time Ayega) असे या गाण्याचे बोल आहेत.
या सिनेमासाठी रणवीरने रॅपिंगचे प्रशिक्षणच घेतले नाही तर सिनेमात आवाजही दिला आहे. रॅपिंगमधील रणवीरचे परेफेक्शन गाण्यात अगदी हमखास जाणवते. यातून रणवीरचा एक खास पैलू समोर येत आहे. रॅपिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी रणवीर सज्ज झाला आहे. (पाहा: Gully Boy Poster)
तुम्हीही ऐका रणवीर सिंगच्या आवाजातील हे गाणे....
या सिनेमात रणवीर सिंग रॅपरच्या भूमिकेत असून त्याचा खडतर जीवनप्रवास सिनेमात पाहायला मिळणार आहे. रणवीर-आलिया शिवाय या सिनेमात कल्की कोचीन, अली असगर, परमित सेठी आणि पूजा गौर प्रमुख भूमिकेत आहेत. झोया अख्तर दिग्दर्शित हा सिनेमा 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.