Swatantrya Veer Savarkar: रणदीप हुडा स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावा; मनसेची मागणी
त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी आता होत आहे.
Swatantrya Veer Savarkar: रणदीप हुडा (Randeep Hooda) स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये एकूण 10 कोटींहून अधिक कमाई केली आहे. रणदीप हुडाने 'स्वातंत्र्य वीर सावरकर' यांच्या भूमिकासाठी 26 किलो वजन कमी केले आहे. त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी आता होत आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट अधिकाधिक चित्रपटगृहांमध्ये आणि लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी राज ठाकरे यांचा पक्ष मनसेने केली आहे. मनसे चित्रपट विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शुक्रवारी मराठी ट्विट करून रणदीप हुडा अभिनीत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची मागणी केली. (हेही वाचा -Swatantra Veer Savarkar Collection: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचे सहाव्या दिवशीचे कलेक्शन एक कोटीपेक्षा कमी)
अमेय खोपकर यांनी त्यांच्या X (ट्विट) पोस्टमध्ये लिहिले की, 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं बलिदान, देशासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा सर्वसामान्य प्रेक्षक तसंच सध्याच्या युवापिढीसाठी आदर्श ठरेल असाच आहे. यासाठी रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचणं गरजेचं आहे. म्हणूनच राज्य सरकारकडे आमची मागणी आहे की हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्यात यावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून आजच्या पिढीला प्रेरणा मिळाली तर आजच्या काळातही देशासाठी ते मोठं योगदान ठरु शकतं.' (वाचा - Swatantrya Veer Savarkar:'वीर सावरकर' चित्रपटाचा मराठी ट्रेलर लाँच, सुबोध भावे झाला सावरकरांचा आवाज)
रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत 22 मार्च रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रणदीप हुडाने सावरकरांसारखे दिसण्यासाठी शरीरात आश्चर्यकारक बदल केले. या भूमिकेसाठी रणदीपने 26 किलो वजन कमी केले. ज्याचा एक फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये रणदीप हुड्डा खूपच कमजोर दिसत होता. त्याच्या पात्रासाठी घेतलेली मेहनत पाहून चाहत्यांनीही त्याचे खूप कौतुक केले आहे.