Pinkie Roshan Tests Positive for Coronavirus: हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांना कोरोना विषाणूची लागण; तब्येत स्थिर असल्याची माहिती
सध्या त्या पती राकेश रोशसमवेत आपल्या घरापासून दूर खंडाळ्यातील फार्महाउसवर आहेत.
अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) आई पिंकी रोशन (Pinkie Roshan) यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. सध्या त्या पती राकेश रोशसमवेत आपल्या घरापासून दूर खंडाळ्यातील फार्महाउसवर आहेत. सांगितले जात आहे की पिंकी रोशन यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत आणि नियमित योगामुळे त्यांची तब्येत स्थिर आहे. पिंकी रोशन यांनी आपल्या तब्येतीबद्दल एका न्यूज पोर्टलला सविस्तरपणे सांगितले आहे. दुसरीकडे हृतिक रोशन, मुले आणि पत्नी सुझानसोबत मुंबईमध्ये आहे. हृतिक रोशनचे घर जुहूपासून थोड्या अंतरावर आहे. अलीकडेच गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. हा उत्सव सर्वांनी मिळून साजरा केला होता.
पिंकी रोशनच्या म्हणण्यानुसार, त्यांचे संपूर्ण कुटुंब दर 20 दिवसांनी कोरोना टेस्ट करून घेते. गेल्या आठवड्यात केलेल्या चाचणीमध्ये पिंकी यांची कोरोना विषाणू चाचणी पॉझिटिव्ह आली. परंतु त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. पिंकी रोशन याबद्दल सांगतात- ‘माझ्यात काही लक्षणे नाहीत, योग केल्यामुळे माझी स्थिती नियंत्रणात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र हा व्हायरस 15 दिवस तरी माझ्या शरीरामध्ये असेल. शुक्रवारी मी आणखी एक चाचणी करून घेणार आहे व तेव्हा ती नकारात्मक येण्याची आशा आहे.’
गेल्या एका आठवड्यापासून आपल्या घरातून दूर असलेल्या पिंकी यांनी आपल्या वाढदिवसाच्या सरप्राईजचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी चाहत्यांना माहिती दिली की, त्यांनी जेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा दरात एक सरप्राईज होते. एका मोठ्या ‘P’ वर बर्थडे बलून्स लावले होते. (हेही वाचा: Sanjay Dutt gets Victory from Lung Cancer: संजय दत्त याची कॅन्सरवर मात, सोशल मीडियात केली 'ही' खास पोस्ट)
दरम्यान, नुकतेच पिंकी रोशन यांनी सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या. ’लोकांना सत्य जाणून घ्यायचे आहे मात्र त्यासाठी कोणी सत्य मांडत नाही.’ पिंकी यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र लोक हे समजून घायचा प्रयत्न करीत आहे की, पिंकी यांनी नक्की कोणावर निष्ण साधला होता.