Neha Kakkar Sings Live for Husband Rohanpreet Singh Video: नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नात सजली सूरांची मैफिल, रोमँटिक गाणे गाताना दिसले हे कपल
या सोहळ्यात या दोघांनी सुंदर लाईव्ह गाणी (Live Songs) गायली.
बॉलिवूडमधील आणखी एक शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) हे दोघेही विवाहबंधनात अडकले असून एक धुमधडाक्यात आणि थाटामाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत अगदी कमीच पाहुणे उपस्थित होते. या विवाहसोहळ्यातील डेकोरेशन, जेवण एकूणच या सोहळ्याची तयारी ही डोळे दिपवणारी होती. त्यात नवविवाहित जोडपे नेहा आणि रोहनप्रीतने आपल्या आवाजाने या कार्यक्रमाची रौनक आणखी वाढवली. या सोहळ्यात या दोघांनी सुंदर लाईव्ह गाणी (Live Songs) गायली.
सोशल मिडियाला नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्न सोहळ्याचे फोटो, व्हिडिओज प्रचंड व्हायरल होत आहेत. हा कपल ने शनिवारी एका गुरुद्वारा मध्ये पंजाबी रितीने विवाह केला. त्यानंतर लाल लेहंगा घालून पारंपारिक पद्धतीने नेहाने रोहनप्रीतशी लग्न केले. नेहा ने आपल्या लग्नात आपल्या परिवारासह आपल्या आवाजाने येथील लोकांचे मनोरंजन देखील केले. या व्हिडिओमध्ये नेहा आणि तिचा भाऊ टोनी कक्कड़ (Tonny Kakkar) गाणे गाताना दिसत आहे. Neha Kakkar Mehndi Ceremony: नेहा कक्कड़ हिच्या हातावर रंगली रोहनप्रीत सिंह च्या नावाची मेहंदी (See Pics)
त्याचबरोबर तिने रोहनप्रीतसह देखील गाणे गायले. या दरम्यान रोहन प्रचंड खूश दिसत होता. नेहाचे गाणे ऐकून रोहनप्रीत भारावून गेले.
त्यानंतर रोहनप्रीतसुद्धा नेहासाठी गाणे गायले. जे ऐकून नेहा ला अश्रू अनावर झाले.
या जोडप्याने आपल्या लग्नसमारंभात आपल्या कुटूंबासह धमाल केली. त्याचे प्रत्येक सुंदर क्षण कॅमे-यात टिपले आहे.