Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनचा पत्नी आलियासोबतचा वाद मिटला, मुलांसाठी आले एकत्र
या फोटोमध्ये आलिया,नवाजुद्दीन यांच्यासोबत शोरा आणि यानी दिसत आहेत.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) यांच्यात अनेक महिन्यांपासून मतभेद सुरु होते. आलियानं नवाजुद्दीनवर अनेक आरोप केले. अखेर आता नवाजुद्दीन आणि आलिया यांच्यातील वाद मिटला आहे. आलियाने तिच्या नवाजुद्दीनच्या लग्नाचा 14 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये आलिया,नवाजुद्दीन यांच्यासोबत शोरा आणि यानी दिसत आहेत. नवाजुद्दीन आणि आलिया हे आपली मुलगी शोरा आणि मुलगा यानी यांच्यासाठी मतभेद विसरून एकत्र आले आहेत. (हेही वाचा - Sai Tamhankar: इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत सई ताम्हणकर दिसणार 'या' नव्या प्रोजेक्ट्समध्ये)
आलियाने तिच्या नवाजुद्दीनच्या लग्नाचा 14 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये आलिया,नवाजुद्दीन यांच्यासोबत शोरा आणि यानी दिसत आहेत. आलियानं या फोटोला कॅप्शन दिलं, "आम्ही फॅमिलीसोबत आमच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा केला." यावेळी ,"गेल्या काही दिवसांपासून माझ्या आयुष्यात काही गोष्टी बदलल्या आहेत. मला वाटले की जेव्हा आपण वाईट गोष्टी जगासोबत शेअर करतो तेव्हा चांगल्या गोष्टीही शेअर केल्या पाहिजेत. मला वाटतं जे चांगलं आहे तेही पाहिलं पाहिजे."
पुढे आलिया म्हणाली की, आता आमच्यातील गैरसमज दूर झाला आहे. आमच्या मुलांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आता आयुष्यात वेगळं राहण्याचा ऑप्शन नाहीये, कारण आमची मुलंही मोठी होत आहेत.तसेच नवाजचा शोरावर खूप जीव आहे आणि जे काही घडले त्यानंतर ती खूप नाराज होती. तिला ते सहन झाले नव्हते. त्यामुळे आम्ही ठरवले की यापुढे आम्ही भांडणार नाही आणि शांततेने एकत्र राहू."