Naseeruddin Shah 'या' गंभीर आजाराला पडले बळी; म्हणाले, 'शांततेत जगणं कठीण आहे'

त्यामुळे तो शांततेत राहू शकत नाही. झोपेतही तो आपले आवडते वाक्य बोलत राहतो.

Naseeruddin Shah (PC -wikimedia commons)

हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने आपल्या चाहत्यांची मने जिंकणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) सध्या एका गंभीर आजाराचा बळी ठरले आहेत. अभिनेत्याने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले की, ते 'ओनोमेटोमॅनिया' (Onomatomania) आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे त्यांना शांती मिळत नाही. या आजारामुळे त्यांना शांत झोपही लागत नाही.

ते क्षणभरही शांत झोपू शकत नाही. झोपेतही त्याचे शब्द मनात घुमत राहतात. मी मस्करी करत नाही, असेही त्यांनी सांगितले. आपण ते शब्दकोशात देखील शोधू शकता. या आजाराविषयी सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की, या आजारामुळे माणूस एकच वाक्य बोलत राहतो. त्यामुळे तो शांततेत राहू शकत नाही. झोपेतही तो आपले आवडते वाक्य बोलत राहतो. (वाचा - Attack Part 1 Trailer Out: John Abraham च्या 'अटॅक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; Watch Video)

नसीरुद्दीन शाहच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता लवकरच ध्रुव लाठेरच्या दिग्दर्शित 'मारिच' या चित्रपटात तुषार कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय 'द स्टोरीटेलर' या चित्रपटात अभिनेता परेश रावल सोबत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Naseeruddin Shah (@naseeruddin49)

नसीरुद्दीन शाह हे शेवटी शकुन बत्राच्या 'गहराइयां' चित्रपटात दीपिका पदुकोणचे वडील मिस्टर खन्ना यांची भूमिका साकारताना दिसले होते. तसेच ते 'कौन बनेगा शिखरवती' या वेबसीरिजमध्येही दिसले होते. ज्यामध्ये ते कर्जबाजारी राजाच्या भूमिकेत दिसले होते. या मालिकेत सोहा अली खान, कृतिका कामरा आणि लारा दत्ता यांच्याही भूमिका होत्या. ही मालिका OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज झाली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif