Salman Khan On Relationship: 'माझ्या प्रेमकथा माझ्यासोबत कबरीत जातील' - सलमान खान
सलमानला त्याच्या लग्नाबाबत विचारले असता तो म्हणाला की, जेव्हा देव ठरवेल, ते होईल. लग्नासाठी दोन माणसांची गरज असते. अजून वेळ आहे. माझे वय 57 आहे. ही वेळ पहिली आणि शेवटची असावी अशी माझी इच्छा आहे.
Salman Khan On Relationship: बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असतो. अभिनेत्याचा डेटिंगचा इतिहास चर्चेत आहे. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सोबतच्या त्याच्या अफेअरच्या बातम्या खूप गाजल्या. याशिवाय संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) सोबतच्या त्याच्या नात्याचीही बरीच चर्चा झाली होती.
अलीकडे, अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वक्तव्य केलं आहे. एका टीव्ही शोच्या होस्टने सलमानला विचारले की, तो आत्मचरित्रात त्याच्या सर्व प्रेमकथांचे तपशील उघड करण्याचा विचार करत आहे का? त्याला त्याने नकार दिला आणि हसत हसत म्हणाला, 'माझ्या प्रेमकथा माझ्याबरोबर कबरीत जातील.' त्याच्या सगळ्या गर्लफ्रेंड चांगल्या असल्याचंही त्याने कबूल केलं. (हेही वाचा -Filmfare Awards 2023: 'The Kashmir Files' 7 कॅटेगरीत नॉमिनेशन मिळूनही एकही अवॉर्ड न मिळाल्यानंतर Anupam Kher यांची बोचरी टीका)
दरम्यान, सलमानला त्याच्या लग्नाबाबत विचारले असता तो म्हणाला की, जेव्हा देव ठरवेल, ते होईल. लग्नासाठी दोन माणसांची गरज असते. पहिल्या प्रकरणात, लग्न अजिबात झाले नाही. मी जेव्हा हो म्हणालो तेव्हा त्या व्यक्तीने नाही म्हटलं आणि जेव्हा मी त्या व्यक्तीने होकार दिला तेव्हा मी नकार दिला. आता दोन्हीकडून नाही आहे. जेव्हा दोन्ही बाजून होकार येईल, तेव्हा लग्न होईल. अजून वेळ आहे. माझे वय 57 आहे. ही वेळ पहिली आणि शेवटची असावी अशी माझी इच्छा आहे.
सलमानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याचा अलीकडेच 21 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर 'किसी का भाई किसी की जान' हा बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे दबंग खान चार वर्षांनंतर पडद्यावर परतला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2023 07:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

