Mumbai: पंचतारांकित हॉटेलमध्ये 'या' अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या पार्टीत ड्रग्जचा वापर, पोलिसांकडून अटक

पार्टीत जेव्हा दारु प्यायली होती तेव्हाच कोणीतरी पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानुसार पोलिसांच्या टीमने पंचतारांकित हॉटेलमध्ये छापेमारी केली.

Naira nehal shah (Photo Credits-Instagram)

Mumbai:  मुंबईत एका बॉलिवूड अभिनेत्रीला आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत ड्रग्जचा वापर करणे महागात पडले आहे. पार्टीत जेव्हा दारु प्यायली होती तेव्हाच कोणीतरी पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानुसार पोलिसांच्या टीमने पंचतारांकित हॉटेलमध्ये छापेमारी केली. त्यावेळी तिच्यासह मित्रांना अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीची ओळख नाइरा नेहल शाह अशी पटली आहे. हे प्रकरण सांताक्रुज पोलीस स्थानकातील आहे.(Sushant Singh Rajput Death Case चा तपास अद्यापही सुरुच- CBI)

नेहल शाह ही तिच्या वाढदिवसाची पार्टी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करत होती. त्यावेळी पार्टीत ड्रग्जचा वापर केला जात होता. पोलिसांनी रविवारी रात्री हॉटेलमध्ये छापा टाकत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की, मध्यरात्री 3 वाजता पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा टाकला. तेथे बॉलीवूडमध्ये लहान भुमिका साकारणारी अभिनेत्री आणि तिच्या मित्रांना ड्रग्जचे सेवन करताना रंगेहाथ पकडले. सांताक्रुज पोलिसांनी या प्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Mika Singh चे KRK Kutta गाणे पाहून संतापला Kamal R Khan, मानहानीचा करणार दावा)

सांताक्रुज पोलीस स्थानकातील वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर गनोरे यांना गुप्त सुत्रांकडून माहिती मिळाली की, बॉलिवूड अभिनेत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी करतेय आणि ड्रग्जचा सुद्धा त्यामध्ये वापर केला जात आहे. तर नेहल शाह हॉटेलच्या एका रुममध्ये चरसचा वापर करत होती. त्याचवेळी तिच्यासह तिचा मित्र आशिक हुसैन याला अटक केली. सोमवारी या दोघांना सांताक्रुज पोलिसांनी दोघांना कोर्टात हजर केले. कोर्टाने या दोघांना जमिनावर सोडले. पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. नाइरा शाह हिने तेलगु चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.