Shilpa Shetty आणि Raj Kundra यांच्या चौकशीसाठी मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश, फसवणूक प्रकरण

मुंबई सत्र न्यायालयाने या दाम्पत्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत सोने व्यापारी पृथ्वीराज सरेमल कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

Shilpa Shetty, Raj Kundra | (Photo credit: archived, edited, representative image)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कुंद्रा आणि तिचा उद्योगपती पती राज कुंद्रा (Raj Kundra) फसवणुकीच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने या दाम्पत्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत सोने व्यापारी पृथ्वीराज सरेमल कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. सत्र न्यायाधीश एनपी मेहता यांच्या खंडपीठाखालील न्यायालयाने कोठारी यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी करण्याचे निर्देश वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलिसांना दिले. तपासात आरोपांची पुष्टी झाल्यास, पोलिसांना भारतीय दंड संहितेच्या (IPC) योग्य कलमांखाली प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवण्याचे आणि सखोल तपास करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

न्यायालयाचे निर्देश

न्यायालयाने आपल्या निर्देशात जोर देत म्हटले की, कोणताही दखलपात्र गुन्हा प्रस्थापित झाल्यास पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करावी. हे जोडपे सत्ययुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे संस्थापक आहेत. तक्रारीनुसार, कंपनीने 2014 मध्ये त्यांनी एक योजना सुरू केली, ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी अर्जाच्या वेळी सवलतीच्या दराने सोन्यासाठी पूर्ण पेमेंट करणे आवश्यक होते, ज्यामध्ये मुदतपूर्तीच्या तारखेला निश्चित रक्कम सोने मिळेल. (हेही वाचा Pornography Racket: ईडीला आढळला नाही Raj Kundra आणि पोर्नोग्राफी रॅकेटमध्ये कोणताही थेट संबंध; आता मनी ट्रेल आणि शेल कंपन्यांची होणार चौकशी)

सराफा व्यापाऱ्याचे आरोप

कोठारी यांच्या कायदेशीर चमूने असा युक्तिवाद केला की, या योजनेत बाजारभावाची पर्वा न करता गुंतवणूकदारांना सोन्याच्या वितरणाची हमी दिली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी कोठारी यांना वेळेवर सोने देण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे त्यांनी योजनेत 90 लाख रुपयांची गुंतवणूक केली. कोठारी यांना शेट्टी आणि कुंद्रा यांनी पाच वर्षांनंतर 2 एप्रिल 2019 रोजी 5000 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याचे वचन दिले होते. तथापि, कंपनी हे वचन पूर्ण करू शकली नाही आणि कोठारी यांना सोने मिळाले नाही. त्यामुले आपली फसवणूक झाली, असा दावा कोठारी यांनी केला आहे. (वाचा -Richard Gere Kissing Incident: सत्र न्यायालयाने शिल्पा शेट्टीला दोषमुक्त करण्याचा आदेश ठेवला कायम)

'फसवणूक करण्याच्या हेतून ठेवली रक्कम'

तक्रारदाराच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की कंपनीच्या जोडप्याने (शेट्टी आणि कुंद्रा) आणि मूळ संचालकांनी, फसवणूक करण्याच्या हेतूनचे कोठारी यांनी गुंतवलेली रक्कमक त्यांच्याकडे ठेवली आहे. निश्चित करारामुळे ती रक्कम ते त्यांना परत देत नाहीत. दरम्यान, अधिवक्ता मिश्रा आणि आचार्य यांनी सादर सांगितले की, कोठारी यांनी बीकेसी पोलिसांसमोर तक्रार दाखल केली होती. ज्यांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांना तक्रारी नोंदवून घ्यावी निर्देश द्यावेत अशी मागणी केली. कोर्टामध्ये सुनावणी सुरु असताना शिल्पाशेट्टी आणि राजकुंद्रा आणि कंपनीचे इतर संचालक न्यायालयात उपस्थित नव्हते.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या आधीहा वादात

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या जोडप्यामध्ये यापूर्वी अनेक कायदेशीर आणि आर्थिक वाद झाले आहेत. सध्या सुरू असलेला तपास फसवणुकीच्या आरोपांची वैधता आणि कायदेशीर प्रक्रियेतील पुढील टप्पे निश्चित करेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif