सुशांत सिंह राजपूत याच्या आठवणीत मौनी रॉय हिने शेअर केले जूने फोटोज (See pics)

त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली. अभिनेत्री मौनी रॉय हिने देखील सुशांत सिंह राजपूत सोबतचे फोटो शेअर करत जून्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Mouni Roy, Ankita Lokhande & Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने 14 जून रोजी वांद्रे (Bandra) येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने उचललेल्या या टोकाच्या पाऊलामुळे कुटुंब, चाहते, मित्रपरिवार या सर्वांनाच जबर धक्का बसला. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली. अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने देखील सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोबतचे फोटो शेअर करत जून्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत च्या आठवणीत त्याच्या पेट डॉग फज चे सुद्धा निधन? जाणून घ्या 'या' व्हायरल पोस्टचं Fact Check)

मौनी रॉय हिने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये सुशांत, अंकिता आणि मौनी दिसत आहेत. पार्टीदरम्यान हे फोटोज काढले गेले आहेत. यात सुशांतसह सारेजण अत्यंत खूश दिसत आहेत. हे फोटोज 2016 मधील असतील असा अंदाज लावण्यात येत आहे. हे फोटो शेअर करत मौनीने पोस्टमध्ये लिहिले, "लक्षात आहे?" (राजकुमार राव करणार 'दिल बेचारा' या सुशांत सिंह राजपूत याच्या अखेरच्या सिनेमाचे प्रमोशन)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

Remember.....?...♥️.....

A post shared by mon (@imouniroy) on

मौनी आणि सुशांतचे हे फोटोज सध्या खूप व्हायरल होत आहेत. तसंच या फोटोजवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोंना 5 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर काहींनी कमेंट्स करत करण जोहर याला अनफॉलो करण्याची विनंती मौनी रॉय हिला केली आहे.