Karwa Chauth 2024: भांगात सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि लाल साडी; Sonakshi Sinha ने पती झहीर इक्बालसाठी केलं पहिले करवा चौथ व्रत

भांगात सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि लाल साडी घातलेल्या सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर आपल्या फोटो शेअर केले आहेत. तिने आपल्या चाहत्यांना करवा चौथच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Karwa Chauth 2024: भांगात सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि लाल साडी; Sonakshi Sinha ने पती झहीर इक्बालसाठी केलं पहिले करवा चौथ व्रत
Sonakshi Sinha Photos (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Karwa Chauth 2024: बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आज तिचा पहिला करवा चौथ साजरा करत आहे. भांगात सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि लाल साडी घातलेल्या सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर आपल्या फोटो शेअर केले आहेत. तिने आपल्या चाहत्यांना करवा चौथच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. ही छायाचित्रे पोस्ट करत सोनाक्षीने लिहिले की, 'मी तुला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते. माझे पती झहीर इक्बाल.' सोनाक्षी सिन्हाने यावर्षी 23 जून 2024 रोजी तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केले. लग्नानंतर सोनाक्षी सिन्हाला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पण कोणाचीही पर्वा न करता सोनाक्षीने इक्बालशी लग्न केले. आता अभिनेत्री तिचा पहिला करवा चौथ साजरा करत आहे. यासाठी सोनाक्षीने खास तयारी केली आहे.

सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये 14 वर्षे पूर्ण केली आहेत. सोनाक्षीने 2010 मध्ये आलेल्या 'दबंग' चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि सोनाक्षी सिन्हाच्या कारकिर्दीला येथून सुरुवात झाली. सोनाक्षी सिन्हाने तिच्या करिअरमध्ये 51 हून अधिक चित्रपट आणि मालिका केल्या आहेत. यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. नुकतीच सोनाक्षी सिन्हा नेटफ्लिक्स सीरिज हीरामंडीमध्ये दिसली होती. या मालिकेत सोनाक्षीने महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि तिचे खूप कौतुकही झाले होते. (हेही वाचा - Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं रजिस्टर पद्धतीनं केला विवाह; पाहा पोस्ट)

सोनाक्षी सिन्हाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती हाऊसफुल 5 मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यासोबतच ती तू मेरी है किरण, खिलाडी 1080 आणि निकिता रॉय आणि द बुक ऑफ डार्कनेस सारख्या प्रोजेक्टच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. (हेही वाचा - Sonakshi-Zaheer Wedding: सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात; मेहंदी सेरेमनीचे फोटो व्हायरल)

सोनाक्षी सिन्हाने पती झहीर इक्बालसाठी केलं पहिले करवा चौथ व्रत, पहा फोटोज -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

दरम्यान, चित्रपटांसोबतच सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि अनेकदा फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर सोनाक्षी सिन्हाला 28 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2024 07:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).