Malaika Arora recovers from coronavirus: आयसोलेशन मध्ये राहिल्यानंतर रुममधून बाहेर पडली मलाइका अरोडा, सोशल मीडियात पोस्ट करुन सांगितला अनुभव

बॉलिवूड मधील हॉट अॅन्ड फिट अभिनेत्री मलाइका अरोडा (Malaika Arora) हिला काही दिवसांपूर्वी कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. तर आता दोन आठवड्यानंतर सोशल मीडियात मलाइकाने तिचा या दोन आठवड्यातील अनुभव एका पोस्टच्या माध्यमातून शेअर केला होता

मलाइका अरोडा (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मधील हॉट अॅन्ड फिट अभिनेत्री मलाइका अरोडा (Malaika Arora) हिला काही दिवसांपूर्वी  कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. तर आता दोन आठवड्यानंतर सोशल मीडियात मलाइकाने तिचा या दोन आठवड्यातील अनुभव एका पोस्टच्या माध्यमातून शेअर केला होता. या इमोशनल पोस्टमधून तिने आपल्या रुमच्या बाहेर आल्यावर कसे वाटत आहे ते सुद्धा सांगितले आहे.(Malaika Arora Tested COVID 19 Positive: अर्जुन कपुर पाठोपाठ मलाइका अरोड़ा ला सुद्धा कोरोनाची लागण)

मलाइका हिने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा फोटो शेअर करत भावुक झाल्याचे दिसून आले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले की, मी खुप दिवसानंतर बेडरुममधून बाहेर पडली आहे. तसेच मी स्वत:ला खुप भाग्यवान समजते की मी कमी त्रासात या कोरोना व्हायरसवर मात केली आहे. डॉक्टरांचे सुद्धा आभार मानते. बीएमसीने निशुक्ल पद्धतीने केलेल्या उपचारासठी सुद्धा त्यांचे धन्यवाद. परिवार, शेजारी, मित्र आणि चाहत्यांनी माझी प्रकृती लवकर सुधरावी यासाठी केलेल्या प्रार्थनेचे सुद्धा आभार. या संकटाच्या काळात तुम्ही लोकांनी जे काही केले त्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतील. तुम्ही सर्वजण सुरक्षित रहा आणि स्वत:ची काळजी घ्या.(Himansh Kohli Covid Tests Positive: बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती)

 

View this post on Instagram

 

"Out and about"...M finally out of my room after so many days days, it feels like an outing in itself.... I feel so blessed to have overcome this virus with minimum pain and discomfort. A big thanks to my doctors for their medical guidance, to BMC for making this process hassle-free, to my family for their immeasurable support and to all my friends, neighbours and fans for all their good wishes and the strength that I got from your messages and support. I can't thank you all enough in words for what everyone has done for me in these difficult times. All of you please stay safe and take care.🤗🙏♥️

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

दरम्यान, अर्जुन कपूर याला सुद्धा कोरोनाची लागण झाल्यानंतर गर्लफ्रेंड मलाइका हिची सुद्धा कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेव्हापासून मलाइका हिने स्वत: घराच क्वारंटाइन झाली होती. मलाइका आजारी होती पण सोशल मीडियात ती अॅक्टिव असल्याचे ही दिसून आले. अभिनेत्रीने नुकताच आपला मुलगा आणि कुत्र्यासह फोटो शेअर करताना इमोशनल झाली होती. त्याचसोबत सोशल मीडियात लस संबंधित एक फनी पोस्ट ही सोशल मीडियात पोस्ट केली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now