Kobe Bryant Death: बास्केटबॉल लीजेंडच्या निधनानंतर अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा सह अनेक बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केलं दुःख
Bollywood Mourns The Demise Of Kobe Bryant: जगभरातील प्रसिद्ध अमेरिकन बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. 41 वर्षीय असलेला हा दिग्गज खेळाडू आपल्या 13 वर्षीय मुलीसोबत हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याने तिनेही या अपघातात आपले प्राण गमावले आहे.
Bollywood Mourns The Demise Of Kobe Bryant: जगभरातील प्रसिद्ध अमेरिकन बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. 41 वर्षीय असलेला हा दिग्गज खेळाडू आपल्या 13 वर्षीय मुलीसोबत हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याने तिनेही या अपघातात आपले प्राण गमावले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर, हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडमध्येही या बातमीने शोककळा पसरली आहे. अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या ट्विटद्वारे दुःख व्यक्त केलं आहे.
प्रियांकाने बास्केटबॉल चॅम्पियनसाठी एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. ती लिहिते की, "कोबी ब्रायंटमुळे एनबीएशी माझी पहिली खरी ओळख झाली. मी क्वीन्स न्यूयॉर्कमध्ये 13 वर्षांची होते, त्याची गोड मुलगी जियाना हिच्या वयाची. त्यानेच माझ्या मनात खेळासाठी, स्पर्धेसाठी आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीची ज्योत निर्माण केली. त्याने संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. त्याचा वारसा बास्केटबॉलपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. या अपघाताबद्दल ऐकून मी हादरले आणि खूप दु: खी झाले आहे. "
रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. अर्जुनने लिहिले की, “आयुष्य खरंच अस्थिर आहे, पण शेवटी सर्वच निरर्थक वाटते.” रणवीरने देखील सोशल मीडिया पोस्ट लिहीत कोबीच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
Life is fickle, it all eventually feels kind of pointless. R.I.P @kobebryant #blackmamba #24
A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on
अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावर लिहिले, "निःशब्द! आपण कोबी ब्रायंट यांच्या मृत्यूमुळे एक बास्केटबॉलचा #ब्लॅकमम्बा लिजेंड गमावला आहे. माझ्या भाचीसह अनेक लहान मुलांना खेळण्यासाठी प्रेरित करणाऱ्या या खेळाडूला व त्याच्या मुलीच्या आत्म्यास शांती मिळो."
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)