Kirat Assi Catfishing: किरात अस्सी, 10 वर्षे कॅटफिशिंगची बळी; Netflix ने थेट काढला Sweet Bobby: My Catfish Nightmar माहितीपट

ज्यामध्ये तिची चुलत बहीण सिमरन भोगल बॉबी जांडू या काल्पनिक माणसाच्या रूपात पाहायला मिळते. हीएक फसवणूक आणि विश्वासघाताची धक्कादायक कहाणी आहे.

Kirat Assi | (Photo Credit YouTube screenshot)

किरात अस्सी (Who is Kirat Assi), पश्चिम लंडन येथील एक 43 वर्षीय रेडिओ सूत्रसंचालक. जी अलिकडील काळात कुख्यात कॅटफिशिंग प्रकरणांची बळी ठरल्याचे एक उदाहरण. धक्कादायक असे की, तिची चुलत बहीण समिरन भोगल (Simran Bhogal) हिच या जवळपास 10 वर्षे जाललेल्या प्रकरणात सहभागी होती. हे प्रकरण सध्या जगभर गाजते आहे. या ऑनलाईन फ्रॉड आणि फसवणूक (Online Scams, Social Media Fraud) प्रकाराची कथा घेऊन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यावर एक माहतीपटच (Netflix Documentary) बनवला आहे. अलेक्सी मोस्टरसने सूत्रसंचालन केलेल्या लोकप्रिय सत्य-गुन्हे पॉडकास्ट स्वीट बॉबीद्वारे हे प्रकरण प्रथम 2022 मध्ये उघडकीस आले. नेटफ्लिक्सवरील 'स्वीट बॉबीः माय कॅटफिश नाईटमेअर" (Sweet Bobby: My Catfish Nightmare) हा माहितीपट दशकभर चाललेल्या कॅटफिशिंग प्रकाराचा किरात हिच्यावर झालेल्या मानसिक परिणामाचा उलघडा करतो.

भावनांची गुंतागुंत आणि रोमँटीक नाते

नेटफ्लिक्स माहितीपट, मीडिया रिपोर्ट आणि उपलब्ध माहितीनुसार, किरात अस्सी हिची अग्निपरीक्षा 2009 मध्ये सुरू झाली. जेव्हा तिने तिची चुलत बहीण सिम्रनच्या माजी प्रियकराचा भाऊ बॉबी जांडू याला फेसबुकवर शोकसंदेश पाठवला. ही निष्पाप देवाणघेवाण लवकरच एका भावनिक नात्यात विकसित झाली. जी 10 वर्षांहून अधिक काळ टिकली. किरातच्या नकळत, ती ज्या व्यक्तीशी संवाद साधत होती ती खरी नव्हती, तर स्वतः सिम्रानने रचलेले पात्र होते. याचाच अर्थ असा की, किरात हिची बहीणच एका नावाचे आणि जिवंत माणसाचे सोंग घेऊन तिच्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत होते. (हेही वाचा, Social Media Fraud: फेसबुकवर मैत्री केल्यानंतर महिलेला घातला 2.5 कोटी रुपयांचा गंडा)

किरात आणि बॉबी आभासी प्रेमात

किरात अस्सी आणि कथीत बॉबी यांच्यात ऑनलाईन मैत्रीपूर्ण संबंध म्हणून जे सुरू झाले ते एका रोमँटिक नात्यात बदलले. ज्याने दोघांमध्ये दैनंदिन फोन कॉल आणि संदेशांची देवाणघेवाण सुरु झाली. ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा हृदयरोगतज्ज्ञ असल्याचा दावा करणारा बॉबी, अनेकदा स्वतःला गोळी लागणे किंवा ब्रेन ट्यूमरने ग्रस्त असणे यासारख्या अत्यंत गंभीर परिस्थितीत असल्याचे दर्शवत असे. त्यांचे घट्ट बंध असूनही, किरात आणि बॉबी कधीही प्रत्यक्ष भेटले नाहीत किंवा त्यांनी परस्परांना व्हिडिओ कॉल देखील केले नाहीत. (स्वयंघोषित बाबाचा प्रताप; पाच विवाह, भावाच्या पत्नीवर बलात्कार व 32 मुलींशी चॅटिंग सुरु असताना सहाव्या लग्नाची तयारी, पोलिसांकडून अटक)

गुप्तहेरामुळे भांडाफोड

जसजशी वर्षे सरत गेली तसतसे हे नाते विषारी झाले. बॉबी अधिकाधिक कठोर आणि रुक्ष होत गेला. ज्यामुळे किरात दु:खात लोटली गेली. तिच्या मानत एक लक्षणीय भावनिक ताण निर्माण झाला. संशयास्पद आणि व्यथित झालेल्या किरात हिने अखेरीस बॉबीची खरी ओळख उघड करण्यासाठी एका खाजगी गुप्तहेराला नियुक्त केले. गुप्तहेराकडून मिळालेल्या माहितीनुसार तिला जे आढळले ते धक्कादायक होते. बॉबी नावाची कोणी व्यक्ती या भूतलावावरच नव्हती. जी होती ती तिची चुलत बहीण, सिमरन भोगल होती आणि तिनेच हा फसवणुकीचा संपूर्ण कट रचला होता. जो पाठिमागील 10 वर्षांपासून सुरु होता. किरातला त्याची पुसटशी कल्पनादेखील आली नाही.

बॉबी भासवली समिरन निघाली

किरातने एका मुलाखतीदरम्यानस सांगितले की, माझ्यासोबत जे घडले त्यातून मी अद्यापही सावरली नाही. एके दिवशी चक्क सिमरन माझ्या घरी आली आणि ती माझ्यासमोर उभा राहिली. तिने मला सांगितले की, पाठिमागील 10 वर्षांपासून अधिक काळ मी ज्या बॉबी नामक व्यक्तीशी बोलत होते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती मी स्वत:च होते असे तिने (सिमरन) हिने मला सांगितले. ज्यामुळे मला प्रचंड धक्का बसला. ती म्हणाली, मी आज कबुली देते की, 10 वर्षांपासून बॉबी म्हणून सोबत असलेली व्यक्ती मी स्वत:च आहे.

स्वीट बॉबीः माय कॅटफिश नाईटमेअर ट्रेलर

कायदेशीर आव्हान आणि निकाली निघालेला खटला

दरम्यान, भावनिक आघात होऊनही, यु. के. मध्ये कॅटफिशिंग बेकायदेशीर नसल्यामुळे, सिमरन हिस कोणत्याही फौजदारी आरोपांचा सामना करावा लागला नाही. तथापि, किरातने 2020 मध्ये तिच्या चुलत बहिणीविरुद्ध दिवाणी खटला चालवला, जो सिमरनने औपचारिक माफीनामा घेऊन न्यायालयाबाहेर निकाली काढण्यात आला.

किरात अस्सीचा प्रतिसाद आणि चालू असलेला वकिली

माितीपटाच्या माध्यमातून तिची कथा सार्वजनिकपणे उघड झाल्यानंतर, किरातने तिचा अनुभव सामायिक करण्यासाठी आणि अशाच प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या इतरांना मदत करण्यासाठी समर्पित एक संकेतस्थळ सुरू केले. तिच्या कथेने लक्षणीय लक्ष वेधून घेतले आहे. परंतु तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बरेच काही खाजगीच राहिले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif