Zero Movie Review: Zero सिनेमातील अभिनयानंतर Katrina Kaif वर समीक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव
ZERO सिनेमात कॅटरिना कैफने साकारलेल्या भूमिकेचं होतयं सर्वत्र कौतुक !
Zero Movie Review: शाहरूख खान (Shahrukh Khan) , कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) बहुप्रतिक्षित सिनेमा 'झिरो' (Zero) आजपासून सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. स्पेशल स्क्रिनिंगनंतर समोर आलेल्या झिरो सिनेमाच्या रिव्ह्युवरून अनेक समीक्षकांनी कॅटरिना कैफचं (Katrina Kaif) कौतुक केलं आहे. भारतात वास्तव्य नसलेली कॅटरिना 15 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये आली. सलमान खानने (Salman Khan) कॅटरिना कैफला इंडस्ट्रीमध्ये महत्त्वाचे सिनेमे मिळवून दिले. सुरूवातीला कॅटरिनाच्या कामाची, अभिनयाची फारशी दखल घेतली नव्हती. मात्र झिरो सिनेमामधील तिच्या अभिनयाची विशेष दखल समिक्षकांनीही घेतल्याने कॅटरिनाच्या फॅन्समध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.
Times of India च्या रिव्ह्युनुसार, सिनेमामध्ये कॅटरिना अगदीच काही सिन्समध्ये झळकली आहे. मात्र बॉलिवूड स्टार म्हणून ज्या आत्मविश्वासाने तिने काम केलं आहे ते वाखाण्याजोगं आहे. शाहरूखचा चार्म, अनुष्काचं उत्तम काम आणि कॅटरिना कैफचा मन जिंकणारा परफॉर्मन्स पाहण्याजोगा आहे. Zero Song Husn Parcham : Katrina Kaif च्या बोल्ड अंदाजातील 'हुस्न परचम' गाणं रसिकांच्या भेटीला !
Showsha.com ने दिलेल्या माहितीनुसार, कॅटरिनाने कठीण वाटणारे अनेक सिन्स अगदी लीलया साकरले आहेत. सिने कारकीर्दीमध्ये जिच्या अभिनयावर टीका झाली होती अशा एखाद्या अभिनेत्रीचा इतका दमदार अभिनय पाहण्याजोगा आहे.
Hindustan Times,ने शेअर केलेल्या रिव्ह्युमध्ये अनुष्काच्या कामावर टीका करण्यात आली आहे. मात्र कॅटरिना कैफच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले आहे.
Livemint ने लिहलेल्या रिव्ह्युमध्ये एक हार्टब्रेक झालेली आणि दारूच्या आहारी गेलेली मुलगी, अभिनेत्रीची भूमिका पाहता तिचा हा दमदार अभिनय दखल घ्यायला भाग पडणार आहे.
Scroll.in ने लिहलेल्या रिव्ह्युमध्येही कॅटरिना कैफने साकारलेल्या बबिता या सेलिब्रीटीची भूमिका पाहणं हे झिरो सिनेमातील एक मोठं सरप्राईज आहे.
Film Companion कडूनही कॅटरिना कैफचं कौतुक झालं आहे. कॅटरिना कैफ ही झिरो सिनेमातील बेस्ट गोष्ट आहे असे म्हटले आहे.
Filmfare ने लिहलेल्या रिव्ह्युमध्ये कॅटरिना कैफ चं कौतुक करताना भविष्यात अशाचप्रकारे 'हिरो' रूपातील कॅटरिना कैफ पहायला आवडेल असे म्हटलं आहे. Torrent, TamilRockers नव्हे तर ट्विटर वरच LEAK झाला शाहरूखच्या ZERO सिनेमाचा काही भाग!
शाहरूख खानच्या 'झिरो' सिनेमाला ख्रिस्मसच्या विकेंडला सोलो रिलीज मिळालं आहे. या सिनेमात शाहरूख एका बुटक्या व्यक्तीची, अनुष्का एका दिव्यांग वैज्ञानिकाची तर कॅटरिना कैफ अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. आजपासून सर्वत्र हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)