Nagabhushan Rammed Car Into Couple: कन्नड अभिनेता नागभूषणने जोडप्याला दिली कारने धडक; महिलेचा मृत्यू, अभिनेत्याला अटक

शनिवारी रात्री 9.45 च्या सुमारास नागभूषणाने वसंतापुरा मुख्य रस्त्यावरील फूटपाथवरून चालत असलेल्या जोडप्याला आपल्या कारने धडक दिली. ते उत्तरहल्लीहून कोननकुंटेकडे निघाले होते. प्राप्त माहितीनुसार, अभिनेत्याने प्रथम जोडप्याला धडक दिली. नंतर त्याची कार थेट विजेच्या खांबाला जावून धडकली.

Nagabhushan (PC - Instagram)

Nagabhushan Rammed Car Into Couple: कन्नड अभिनेता नागभूषण (Nagabhushan) याने शनिवारी बेंगळुरूमध्ये एका जोडप्याला त्याच्या कारने धडक दिली. या अपघातात (Accident) महिलेचा मृत्यू झाला तर पुरुषावर उपचार सुरू आहेत. बेंगळुरूमधील कुमारस्वामी वाहतूक पोलिस ठाण्यात अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रारीत अभिनेत्याने वेगात आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याचे म्हटले आहे. महिलेच्या मृत्यूनंतर नागभूषणला अटक करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री 9.45 च्या सुमारास नागभूषणाने वसंतापुरा मुख्य रस्त्यावरील फूटपाथवरून चालत असलेल्या जोडप्याला आपल्या कारने धडक दिली. ते उत्तरहल्लीहून कोननकुंटेकडे निघाले होते. प्राप्त माहितीनुसार, अभिनेत्याने प्रथम जोडप्याला धडक दिली. नंतर त्याची कार थेट विजेच्या खांबाला जावून धडकली. (हेही वाचा - Anushka Sharma Second Pregnancy: अणुष्का आणि विराटने दिली गुड न्युज, विरुष्काच्या घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा?)

दरम्यान, प्रेमा (48) हिचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर तिचा नवरा कृष्णा (58) याच्या दोन्ही पायांना, डोक्याला आणि पोटाला दुखापत झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागभूषणने स्वत: या जोडप्याला रुग्णालयात नेले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nagabhushana N S (@dr.bhushana)

नागभूषण शेवट तगारुपाल्य या चित्रपटात दिसला होता. त्याने 2018 मध्ये संकट कारा गणपती मधून पदार्पण केले. त्याने कौसल्या सुप्रजा रामा, डेअरडेव्हिल मुस्तफा, बडावा रास्कल, इक्कत, मेड इन चायना आणि इतर सारख्या इतर चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या होत्या. 2022 मध्ये, त्याने इक्कत चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता श्रेणीमध्ये SIIMA पुरस्कार जिंकला. नागभूषणचे इंस्टाग्रामवर 71.8K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement