Bawaal New Release Date: जान्हवी कपूर आणि वरुण धवनच्या 'बवाल'च्या रिलीजची तारीख बदलली; 'या' दिवशी चित्रपटगृहात होणार दाखल
हा चित्रपट यापूर्वी 7 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता.
Bawaal New Release Date: बॉलिवूड अभिनेता जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) चा बवाल हा 2023 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. बवालच्या सेटवरून आत्तापर्यंत अनेक फोटो समोर आले आहेत, जे सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले होते. बवाल चित्रपटामध्ये पहिल्यांदाच वरुण धवन आणि जान्हवी कपूरची जोडी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. आता या चित्रपटाचे अपडेट समोर आले आहे. बवालच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट यापूर्वी 7 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता.
बुधवारी, चित्रपटाचा अभिनेता वरुण धवन आणि निर्माता साजिद नाडियादवाला यांनी बवालच्या नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. बवाल आता या वर्षी 6 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. ट्विट शेअर करताना वरुण धवनने म्हटलं आहे की, "बवाल 6 ऑक्टोबर, 2023 रोजी रिलीज होत आहे. जान्हवी मॅडमसोबत पहिल्यांदा काम करत आहे आणि साजिद नाडियाडवाला आणि नितेश तिवारी सरांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या टीमचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे." (हेही वाचा - Jee Rahe The Hum Song Out: पूजा हेगडेच्या प्रेमात पडला सलमान खान; 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील नवीन गाणं 'जी रहे थे हम' प्रदर्शित, Watch)
बवालचे शूटिंग गेल्या वर्षी पूर्ण झाले आहे. चित्रपटाचा मोठा भाग उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात शूट करण्यात आला आहे. भारताव्यतिरिक्त पॅरिस, अॅमस्टरडॅम आणि पोलंडसारख्या सुंदर देशांमध्येही या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा चित्रपट परिपूर्ण बनवण्यासाठी स्टंट दिग्दर्शक आणि स्टंटमन यांना खास जर्मनीतून नेमण्यात आले होते.
हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, बवालचा एक अॅक्शन सीन शूट करण्यासाठी भरपूर शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. यामध्ये असंख्य ग्रेनेड, चाकू आणि विविध प्रकारची स्फोटके यांचा समावेश आहे. बवालचा हा एक अॅक्शन सीन शूट करण्यासाठी 10 दिवस लागले. तसेच यासाठी 2.5 कोटींच्या जवळपास खर्च झाले. बवाल हा वरुण धवनच्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे.