India's Biggest Thali: अभिनेता Sonu Sood च्या नावावर सादर झाली भारतातील सर्वात मोठी थाळी; एकावेळी 20 लोक एकत्र जेवू शकतात (See Photos)

हा अनोखा सन्मान सोनू सूदला हैदराबादच्या जिस्मत गेलमंडीने दिला आहे.

Indias Biggest Thali (संग्रहित संपादित प्रतिमा)

सोनू सूद (Sonu Sood) हा बॉलिवूडचा दमदार अभिनेता मानला जातो. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये खास ठसा उमटवला आहे. कोरोना महामारीच्या काळात सोनू सूदने लाखो लोकांना मदत केली होती. तेव्हापासून तो चर्चेत आहे आणि या मदतीमुळे जनतेच्या मनामध्ये सोनू सूदबद्दल खास स्थान निर्माण झाले आहे. लोक त्याला आपला देव मानतात. इतकेच नाही तर दक्षिणेत त्याचे मंदिर बांधण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा सोनू सूद एका खास गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

सोनू सूदने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनू सूद भारतातील सर्वात मोठ्या जेवणाच्या थाळीजवळ उभा असल्याचे दिसत आहे. ही थाळी प्रचंड मोठी असून, ती पूर्णपणे बिर्याणीने भरलेली असल्याचे दिसून येत आहे. या थाळीजवळ उभा राहून सोनू सूद पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत सोनू सूदने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या नावाने असलेली भारतातील सर्वात मोठी थाळी. मी शाकाहारी आहे. मी फार कमी खातो मात्र आता एका वेळी 20 लोक जेवतील इतकी मोठी थाळी माझ्या नावावर आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

हेही वाचा: शाहरुख खानच्या 'पठाण'ने रचला इतिहास; Bahubali 2 ला मागे टाकून ठरला सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट)

अशाप्रकारे या मोठ्या बिर्याणी थाळीची खास गोष्ट म्हणजे तिला सोनू सूदचे नाव देण्यात आले आहे. हा अनोखा सन्मान सोनू सूदला हैदराबादच्या जिस्मत गेलमंडीने दिला आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेकांना मदत केल्याने देशभरात सोनू सूदला विविध प्रकारे सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. सोनू सूदवर चाहत्यांनी आपापल्या पद्धतीने प्रेमाचा वर्षाव केला आहे. आता असाच एक खास सन्मान सोनूसूदला मिळाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif