जेव्हा Priyanka Chopra साठी Hrithik Roshan बनला होता रियल लाइफ सुपर हिरो

त्याच्या सहकलाकारांसोबत सुद्धा मदतीच्या नात्यानेच तो बोलतो. त्याची हिच उदारता गेल्या दोन दशकांमध्ये काही ठिकाणी किंवा एखाद्या सहकर्मचाऱ्यासोबत दिसून आली आहे.

ऋतिक रोशन आणि प्रियंका चोपडा

भारतीय सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आपल्या दयाळू स्वभावाचा असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. त्याच्या सहकलाकारांसोबत सुद्धा मदतीच्या नात्यानेच तो बोलतो. त्याची हिच उदारता गेल्या दोन दशकांमध्ये काही ठिकाणी किंवा एखाद्या सहकर्मचाऱ्यासोबत दिसून आली आहे. अशातच प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) हिचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. प्रियंका हिने ऋतिक सोबत क्रिश, अग्निपथ आणि क्रिश 3 मध्ये काम केले आहे. या दरम्यान प्रियंका हिच्या वडीलांची प्रकृती ठिक नसताना ऋतिकने कशा पद्धतीनेतिला मदत केली याचा अनुभव तिने शेअर केला आहे.

नुकतीच प्रदर्शित करण्यात आलेली ऑटोबायोग्राफी अनफिनिश्ड (Unfinished) मध्ये प्रियंका हिने आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जेव्हा तिने इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. तिने असे म्हटले आहे की, वडिलांची प्रकृती गंभीर होती मी क्रिश या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग करत होती. पण जेव्हा ऋतिक याला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला.(Aamir Khan च्या फिटनेस ट्रेनरच्या प्रेमात पडली मुलगी Ira Khan; Valentines Day अगोदर शेअर केले रोमँटिक फोटोज)

ऋतिक याने प्रियंका हिच्या वडिलांच्या गंभीर स्थितीत तिची पूर्ण मदत केली. तसेच परदेशात उपचारासाठी शिफ्ट करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी सुद्धा केल्या. वडिलांना परदेशात शिफ्ट करण्यासाठी त्याने आपल्या ओखळीच्या माणसांसोबत बातचीत करत त्यांना उपचारासाठी नेण्याची व्यवस्था सुद्धा केली.ऋतिकने योग्य वेळी केलेल्या मदतीसाठी प्रियंका हिने त्याचे आभार मानले आहेत. तसेच लंडन मध्ये उपचारासाठी वडिलांना दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती सुद्धा सुधारली.