हरियाणाची स्टार डान्सर सपना चौधरीने गुपचूप उरकला साखरपुडा? जाणून घ्या कोण आहे तिचा होणारा नवरा (Photos)
तिच्या नृत्याने तिने केवळ हरियाणाच नव्हे तर पंजाबी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही खूप नाव कमावले आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमध्येही लोक तिच्या नृत्याचे चाहते आहेत
बिग बॉसमुळे घराघरात पोहोचलेली हरियाणाची स्टार डान्सर सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) आयुष्यात एक नवीन वळण येणार आहे. कदाचित या बातमीने सपना चौधरीच्या अनेक चाहत्यांचे काळीज तुटू शकते, कारण आता सपना लग्न करणार आहे. पीटीसी न्यूजनुसार सपना चौधरी यावर्षी लग्न करणार आहे. याचा खुलासा तिने एका शो दरम्यान केला होता. असे म्हटले जात आहे की, सपना चौधरीचा होणारा पतीही हरियाणाचा आहे. मीडिया रिपोर्टनुसार सपना चौधरीच्या होणाऱ्या पतीचे नाव अद्याप समोर आले नाही. खुद्द सपनाने याबाबत काही सांगितले नाही. मात्र रिपोर्ट्सनुसार सपना चौधरी हरियाणाच्या सुपरस्टार वीर साहूशी (Veer Sahu) लग्न करणार आहे.
हे दोघे गेली कित्येक दिवस एकमेकांना डेट करत होते. यासह असेही सांगितले जात आहे की, या दोघांनी गुपचूप साखरपुडाही (Engagement) उरकला आहे. मात्र अद्याप सपना चौधरी किंवा तिच्या टीमने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. वीरला हरियाणाचा बब्बू मान म्हटले जाते. वीरदेखील गायक आणि अभिनेता आहे. त्याचे अनेक संगीत व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेता, निर्माता म्हणून वीर कार्यरत आहे. 2015-16 साली एका पुरस्कार सोहळ्यामध्ये या सपना व वीर यांची भेट झाली होती. (हेही वाचा: सपना चौधरी हिच्या हॉट फोटोंमुळे चाहत्यांचा कलेजा खल्लास, पाहा फोटो)
दरम्यान, हरियाणाची डान्स क्वीन सपना चौधरी तिच्या डान्सबाबत नेहमीच चर्चेत असते. तिच्या नृत्याने तिने केवळ हरियाणाच नव्हे तर पंजाबी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही खूप नाव कमावले आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमध्येही लोक तिच्या नृत्याचे चाहते आहेत. सुरुवातील सपना चौधरी हरियाणा आणि आसपासच्या भागात रागणी कार्यक्रमात भाग घ्यायची. त्यानंतर तिने स्टेज शो करायला सुरुवात केली. पुढे बिग बॉस 11 मधून ती रातोरात स्टार बनली.