83 Release Date: रणवीर सिंहच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; '83' या दिवशी होणार प्रदर्शित
83 हा चित्रपट भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या जिवनावर अधारित आहे.
उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये छाप सोडणाऱ्या रणवीर सिंहचा (Ranveer Singh) अगामी चित्रपट '83'ची सर्वांनाच उस्तुकता होती. 83 हा चित्रपट भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या जिवनावर अधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली, त्या क्षणापासून चित्रपट नेमका केव्हा प्रदर्शित होणार? याचीच उत्सुकता पाहायला मिळाली. दरम्यान, रणवीर सिंहच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र, आज अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुहूर्त मिळाला असून येत्या 4 जूनला 83 चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. यासंदर्भात स्वत: रणवीर सिंहने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
नुकताच रणवीर सिंहने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्याने 83 चित्रपट येत्या 4 जूनला प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रोडक्शन कबीर खान आणि दीपिका पादुकोण करत आहे. हे देखील वाचा- Jhund: प्रतीक्षा संपली! नागराज मंजुळे यांचा झुंड चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित
रणवीर सिंहची इंस्टाग्राम पोस्ट-
83 चित्रपट विश्वचषक 1983 च्या विजयावर आधारित आहे. यामध्ये हरयाणाचा मुलगा म्हणजे क्रिकेटर कपिल देव यांच्या नेतृत्वात खेळलेल्या संघाची कथा या चित्रपटात आहे. या संघाने 1983 मध्ये लंडनच्या लॉर्ड्स स्टेडिअममध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.